​जयंती विशेष : पाहा, अभिनेते प्राण यांचे काही अजरामर संवाद...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 07:21 AM2017-02-12T07:21:37+5:302017-02-12T13:18:22+5:30

अभिनेते प्राण यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान फार मोठे आहे. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी पडद्यावर ‘व्हिलन’ जिवंत केला. खलनायकी भूमिकांचे बेताज बादशहा असेच प्राण यांचे वर्णन करावे लागेल. आज(१२ फेबु्रवारी) त्यांची जयंती. यानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी आणि त्यांचे काही लोकप्रीय संवाद खास तुमच्यासाठी....

Jayanti Special: See, some immortal dialogues of actor Pran ... | ​जयंती विशेष : पाहा, अभिनेते प्राण यांचे काही अजरामर संवाद...

​जयंती विशेष : पाहा, अभिनेते प्राण यांचे काही अजरामर संवाद...

googlenewsNext
ong>अभिनेते प्राण यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान फार मोठे आहे. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी पडद्यावर ‘व्हिलन’ जिवंत केला. खलनायकी भूमिकांचे बेताज बादशहा असेच प्राण यांचे वर्णन करावे लागेल. १२ जुलै २०१३ मध्ये प्राण यांनी अखेरचा श्वास घेतला.अभिनेते प्राण आज आपल्यात नाही. पण आज(१२ फेबु्रवारी) त्यांची जयंती. यानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी आणि त्यांचे काही लोकप्रीय संवाद खास तुमच्यासाठी....



खरे तर प्राण यांना फोटोग्राफर बनायचे होते. आपण मोठ्या पडद्यावर कधीकाळी खलनायकी भूमिका साकारू, याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. चित्रपटात येण्यापूर्वी ते चित्रपटातील पात्रांचे स्केच बनवायचे. 



वयाच्या बाराव्या वर्षी सिगरेटचं व्यसन लागलं आणि मग पानपट्टीच्या दुकानावर वरचेवर येणं जाणं होऊ लागलं. एकदा एक पंजाबी चित्रपटांचा दिग्दर्शकही त्या दुकानात आला होता. या मुलाची सिगारेट ओढण्याची पद्धत, उभं राहण्याची स्टाईल, चेहºावरचे भाव हे सगळं तो दिग्दर्शक आपल्या डोळ्यांनी टिपत होता आणि त्याचवेळी त्याला आपल्या पंजाबी सिनेमासाठी कलाकार मिळाला. हा सिनेमाचा प्रस्ताव त्या मुलाने गांभीर्याने घेतला नाही पण त्या मुलाच्या मागे लागून दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटात या मुलाकडून काम करून घेतलंच. हा पंजाबी चित्रपट चांगलाच यशस्वी झाला आणि  प्राण यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.



यानंतर प्राण यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. कित्येक वेळा तर चित्रपटातल्या मुख्य कलाकारापेक्षा प्राण यांचं मानधन जास्त असायचं. चित्रपट लिहिणारे सिनेमाच्या कथेप्रमाणे नाही तर प्राण यांच्या अभिनय स्टाईलप्रमाणे प्राण यांची भूमिका लिहायचे.आपल्या फिल्मी करिअरची माहिती त्यांनी पित्यापासून लपवून ठेवली होती. पण त्यांची पहिली मुलाखत वृत्तपत्रात छापून आली आणि त्यांच्या वडिलांना सगळे काही कळले. ही मुलाखत वाचून प्राण यांच्या वडिलांना प्रचंड आनंद झाला.



प्राण यांच्या भूमिकेचा पगडा लोकांच्या मनावर इतका जबरदस्त होता की खलनायकाची भूमिका असेल तर लोकं त्यांच्या भूमिकेला घाबरायचे आणि हाच अनुभव प्राण यांना त्यांच्या खºया आयुष्यातही यायचा. लोकं त्यांना टरकून असायची.  पण त्यांचा खरा स्वभाव खूप शांत आणि चांगला होता, अगदी पडद्यावरच्या त्यांच्या खलनायकापेक्षा एकदम विरुद्ध.
 



प्राण यांची प्रत्येक सिनेमात वेगवेगळी स्टाईल असायची आणि तेवढीच वेगळी पद्धत संवाद म्हणण्याचीही. ही विविधता ते आपल्या आजूबाजूला वावरणाºया माणसांकडून आत्मसात करायचे. त्यांचे संवाद लोकप्रिय झालेले अनेक चित्रपट आहेत पण त्यांचा कित्येक चित्रपटांमधला गाजलेला संवाद म्हणजे ‘बरखुरदार’.‘मधुमती’, ‘जंजीर’,‘उपकार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘डॉन’, ‘कर्ज’, ‘नसीब’, ‘पूरब और पश्चिम’ अशा कितीतरी सिनेमातले प्राण यांचे संवाद अजरामर झालेत.

प्राण यांनी १९७२ मध्ये ‘बेईमान’ या चित्रपटासाठी मिळालेला बेस्ट सपोर्टिंगचा फिल्मफेअर पुरस्कार परत केला होता. याचे कारण म्हणजे, कमल अमरोही यांच्या ‘पाकिजा’ या चित्रपटाला एकही पुरस्कार मिळाला नव्हता.

अभिनेता राज कपूर यांच्या ‘बॉबी’ या चित्रपटासाठी प्राण यांनी केवळ १ रूपया मानधन घेतले होते. कारण त्यावेळी राज कपूर आर्थिक संकटातून जात होते.


  

 

Web Title: Jayanti Special: See, some immortal dialogues of actor Pran ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.