दिग्दर्शकाने न सांगता शूट केला होता आक्षेपार्ह सीन, क्रू मेंबर्सकडून अभिनेत्रीला सत्य समजले तोपर्यंत झाला होता बराच उशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 06:00 AM2020-09-10T06:00:00+5:302020-09-10T06:00:00+5:30
.'दलाल' सिनेमामध्ये आयशाबरोबर मिथुन चक्रवर्ती लीड रोलमध्ये होते. शक्ती कपूर आणि रवी बहल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
90 च्या दशकात आयशा जुल्काने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली.आपल्या बहारदार अभिनयाने तिने सिकांवर मोहिनी घातली होती. अभिनयासह आपल्या सौंदर्याने रसिकांना भुरळ घातली. आयशा यांनी नुकताच आपला 48 वा वाढदिवस साजरा केला आहे. आयशाने ‘कुर्बान’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. फक्त बॉलिवूडच नाहीतर तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.
मात्र 1992 मध्ये आयशाने आमिर खानसह ‘जो जीता वो सिकंदर’ सिनेमात झळकली आणि हाच सिनेमा तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. या सिनेमाने तिला अमाप लोकप्रियता तर मिळवून दिलीच पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी या गोष्टीही मिळवून दिल्या. त्याच दरम्यान आयशा वादाच्या भोवऱ्यातही सापडली.
आयशाचा 'दलाल' सिनेमातील इंटिमेट सीन पाहून लोकांना धक्का बसला होता. यावर आयशाने अनेकवेळा स्पष्टीकरणही दिले होते. हा सीन तिने स्वतः केला नसून दिग्दर्शकाने खास हा बॉडी डबलच्या मदतीने शूट करून घेतला होता. इतकेच नाही तर दिग्दर्शकाने तिला न विचारता सीन सिनेमात वापरण्यात आला.'दलाल' सिनेमामध्ये आयशाबरोबर मिथुन चक्रवर्ती लीड रोलमध्ये होते. शक्ती कपूर आणि रवी बहल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. प्रकाश मेनहराने या सिनेमाची निर्मीती केली होती तर पार्थो घोष यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.
आयशाला याबाबत सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी समजले. हे ऐकून तिच्या पाया खालची जमीनच घसरली होती. कारण तिने तसा सीन शूटच केला नव्हता. प्रकाश मेहरा आणि पार्थो घोष यांनी तिला फसवल्याचेही तिने नंतर स्पष्ट केले होते.शुटिंगदरम्यान काही क्रू मेंबर्सने आयशाला सांगितले होते की, मेकर्सने काही सीन ती नसताना बॉडी डबलकडून शूट केले आहेत. मेकर्सशी ती बोलली तेव्हा त्यांनी मात्र तसे काही झाले नसल्याचे स्पष्ट केले. नंतर माफी मागत चूकही मान्य केली. अॅग्रिमेंटमध्ये परवानगीशिवाय बॉडी डबलचा वापर केला जाणार नाही असेही मेकर्सने आयशाला आश्वासन दिले होते, पण ते लेखी नव्हते.
मात्र त्यावेळी आयशाने काही चुकीचे केले नाही हे सर्वांना माहिती होते, त्यामुळे मीडियासह सर्वांचा सपोर्ट तिला मिळाला होता.आयशानेही वाद बाजुला ठेवत इतर सिनेमात काम सुरू ठेवले पण तिचे करिअर फारसे चालले नाही. नंतर तिने बिझनेसमन समीर वाहीबरोबर लग्न करत संसारात रमली.