​दागिने चोरी प्रकरण : आमिरच्या घरातील नोकरांची कसून झडती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2016 12:38 PM2016-11-30T12:38:20+5:302016-11-30T12:38:20+5:30

मि. पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या घरातून सुमारे ८० लाख रुपयांच्या दागिनांची चोरी झाली आणि एकच खळबळ उडाली. त्याची पत्नी किरण ...

Jewelery theft case: A thorough investigation of Aamir's family servants | ​दागिने चोरी प्रकरण : आमिरच्या घरातील नोकरांची कसून झडती

​दागिने चोरी प्रकरण : आमिरच्या घरातील नोकरांची कसून झडती

googlenewsNext
. पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या घरातून सुमारे ८० लाख रुपयांच्या दागिनांची चोरी झाली आणि एकच खळबळ उडाली. त्याची पत्नी किरण रावचे एवढ्या किंमतीचे दागिने चोरी झाल्यामुळे पोलिस यंत्रणासुद्धा झटपट कामाला लागली. संशयित म्हणून घरातील नोकरांची कसून झडाझडती घेण्यात येत आहे.

आमिरच्या घरी गेली १८ वर्षे स्वयंपाक करणाऱ्या फरझाना शेखवर मुख्य संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या ती हाँगकाँगला गेली असल्याचे सांगण्यात येतेय. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन शोध घेतला. यामुळे फरझानाची वृद्ध आई आणि दोन मुले पुरते हादरले आहेत.

तिची आई केसर बेगम म्हणाली की, ‘एवढ्या वर्षांच्या विश्वासू सेवेचे आमिरने ही परतफेडी केली का? माझी मुलगी दिवसरात्र त्यांच्या दिमतीला बांधलेली असायची. रमजानच्या पवित्र महिन्यातही ती घरी येत नसे. एवढे तिचे खान कुटुंबियांप्रती समर्पण होते. आणि तिच्या या सेवेच्या बदल्यात माझ्या मुलीवर चोरीचा आळ घेतला जातोय!’

                                          
                                          शेफ थीफ? : आमिरसोबत फरझाना आणि तिची दोन मुले

                                         
                                          संशयित : आमिर खान, किरण राव आणि ‘फरझाना शेख’ (वर्तुळात)

फरझानाच्या दोन्ही मुलांनासुद्धा खूप धक्का बसला आहे. तिचा लहाना मुलगा सईद अरबाज अली (१८) म्हणाला की, आमिरला माझ्या आईचे हातचे जेवण एवढे आवडायचे की, देशाविदेशात शूटींगसाठी गेल्यावरही तो तिलासोबतच न्यायचा. ‘धुम ३’च्या वेळी तर आई त्याच्यासोबत शिकागोला गेली होती. तिच्या हातचे कबाब खाण्यासाठी आमिर आठवड्यातून एकदा डायट मोडायचा.’

चोरी नेमकी कधी झाली आणि काय काय चोरी गेले याची माहिती पोलिसांनी जाहीर केलेली नाही. किरण रावची सहाय्यक सझैन आणि नोकर झुमकी हेदेखील प्रमुख संशयित आहेत. खान परिवाराला या तिघांवर एवढा विश्वास होता त्यांच्या गैरहजेरीमध्येसुद्धा या सर्वांना संपूर्ण घरात मुक्त वावर करण्याची मुभा होती. पोलिसांनी आमिरच्या आईच्या पुण्यातील ड्रायव्हरचीसुद्धा चौकशी केली आहे.

Web Title: Jewelery theft case: A thorough investigation of Aamir's family servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.