झुमे जो पठान! बादशाह शाहरुखच्या ताफ्यात कलिनन एसयूवी; किंमत 8.2 कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 02:17 PM2023-03-27T14:17:03+5:302023-03-27T14:19:20+5:30

शाहरुख खान सध्या येणारी फिल्म जवानच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. असे असताना शाहरुखने त्याच्या ताफ्यात एक कार आणल्याची खबर लागली आहे.

Jhume Jo Pathan! Rolls-Royce Cullinan SUV in King Shahrukh's fleet; Price 8.2 crores... | झुमे जो पठान! बादशाह शाहरुखच्या ताफ्यात कलिनन एसयूवी; किंमत 8.2 कोटी...

झुमे जो पठान! बादशाह शाहरुखच्या ताफ्यात कलिनन एसयूवी; किंमत 8.2 कोटी...

googlenewsNext

ज्या सिनेमाला कडाडून विरोध झाला, त्याच सिनेमाने देशातील सिनेमांच्या कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. बॉलिवुडलाच नाही तर साऊथच्या सिनेमा, सेलिब्रेटींना जमले नाही तेवढी कमाई शाहरुखने एका चित्रपटातून केली आहे. लोकांनी पठानला डोक्यावर उचलून धरले. ऑनलाईन प्लॅटफॉ़र्मवरही पठान खूप चालला. अर्थात शाहरुखला मालामाल बनवून गेला.... आता या पठानच्या ताफ्यात नवी कोरी कार आली आहे. 

शाहरुख खान सध्या येणारी फिल्म जवानच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. असे असताना शाहरुखने त्याच्या ताफ्यात एक कार आणल्याची खबर लागली आहे. शाहरुखने रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बॅज एसयुव्ही खरेदी केली आहे. या लक्झरी कारची किंमत ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 

बंगळुरुच्या एका ब्लॉगरने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करून शाहरुखच्या या नव्या एसयुव्हीची झलक दाखविली आहे. या कारची ऑन रोड किंमत ९ कोटींवर जाते. कस्टमायझेशन केले तर या कारची किंमत १० कोटींवर जाते. शाहरुखने जी कार घेतलीय ती व्हाईट रंगाची आहे. 

Rolls-Royce Cullinan Black Badge 6.75-litre V12 मध्ये पेट्रोल इंजिन आहे. 571 hp पॉवर आणि 850 Nm पीक टॉर्क जनरेट करते. एसयूव्हीमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. रोल्स रॉयसच्या कार सध्या भारतीय सेलिब्रिटींकडे सर्वाधिक पहायला मिळतात. 

Web Title: Jhume Jo Pathan! Rolls-Royce Cullinan SUV in King Shahrukh's fleet; Price 8.2 crores...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.