Jhund OTT Release: अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' आता ऑनलाईनही बघता येणार, जाणून घ्या कुठे आणि कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:05 IST2022-05-05T15:04:57+5:302022-05-05T15:05:03+5:30
Jhund OTT Release: आता ज्यांना हा सिनेमा सिनेमागृहात बघायला मिळाला नाही ते मोबाइल किंवा लॅपटॉपवर ऑनलाइन बघू शकणार आहेत.

Jhund OTT Release: अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' आता ऑनलाईनही बघता येणार, जाणून घ्या कुठे आणि कधी?
Jhund OTT Release: अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला आणि नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला 'झुंड' सिनेमाला ओटीटी रिलीज करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने सिनेमाच्या डिजिटल रिलीजसाठी आदेश जारी केला आहे. आता ज्यांना हा सिनेमा सिनेमागृहात बघायला मिळाला नाही ते मोबाइल किंवा लॅपटॉपवर ऑनलाइन बघू शकणार आहेत.
'झुंड' च्या कॉपीराइट संदर्भातील एक प्रकरण कोर्टात सुरू होतं. मेकर्सने कॉपीराइटचं उल्लंघन केल्याचा आरोप होता. ज्यानंतर तेलंगणा हायकोर्टाने या सिनेमाच्या ओटीटी रिलीजवर बंदी घातली होती. यानंतर मेकर्सनी हायकोर्टाच्या या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं. यावर सुनावणी देत सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा आदेश रद्द केला आणि सिनेमाला ओटीटीवर रिलीज करण्याचा आदेश जारी केला.
आता अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'झुंड' ओटीटीवर रिलीज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा सिनेमा ६ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज केला जाणार आहे. झुंड हा सिनेमा ४ मार्चला सिनेमागृहात रिलीज करण्यात आला होता. याला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.