माझ्या मुलीसारखेच सुशांतलासुद्धा मारुन टाकलं, जिया खानच्या आईचा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 11:29 AM2020-08-14T11:29:03+5:302020-08-14T11:29:31+5:30

जिया खानप्रमाणे सुशांत सिंग राजपूतला देखील मारुन टाकण्यात आले.

Jiah khan mother rabia khan demands cbi for sushant singh rajput both of them were killed similarly | माझ्या मुलीसारखेच सुशांतलासुद्धा मारुन टाकलं, जिया खानच्या आईचा धक्कादायक आरोप

माझ्या मुलीसारखेच सुशांतलासुद्धा मारुन टाकलं, जिया खानच्या आईचा धक्कादायक आरोप

googlenewsNext

अभिनेत्री जिया खानची आई राबिया खान यांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सीबीआय तपासाला पाठिंबा दर्शविला आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे. जिया खानच्या आईची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ज्यात त्या म्हणातात,  जिया खानप्रमाणे सुशांत सिंग राजपूतला देखील मारुन टाकण्यात आले. सुशांत आणि जिया दोघांनाही खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले, त्यांची फसवणुक करण्यात आली. राजकीय दबावामुळे पोलीस सत्यसमोर आणू शकत नाहीत. त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी आणि त्याच्या हत्येला आत्महत्या म्हणून घोषित केले. बॉलिवूड माफिया आणि त्याचा सिंडिकेट मीडियाचा आधार घेतात आणि डिप्रेशनची स्टोरी बनवून महेश भट्टचा वापर अँकरप्रमाणे करतात. 


पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'सीबीआयने या प्रकरणांच्या तळाशी जाऊन या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अन्यथा ते नराधम जिया आणि सुशांत प्रमाणे दुसऱ्या निष्पाप मुलांना जीव घेतील. 


जिया खानची आई राबिया यांनी याआधीही सलमान खानवर अनेक गंभीर आरोप लावले होते. त्या म्हणाल्या होत्या, ''माझ्या मुलीच्या केस संदर्भात जेव्हा मी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांना सलमान खानचा फोन आला होता. तो दररोज फोन करुन   पैशांबद्दल बोलायचा. म्हणायचा, मुलाची चौकशी करु नका, त्याला काही करू नका, आम्ही काय करू शकतो मॅडम. यानंतर, रबिया या प्रकरणात आणखी उच्च अधिकाऱ्यांपर्यंत देखील घेऊन गेल्या होत्या.'' 
 

Web Title: Jiah khan mother rabia khan demands cbi for sushant singh rajput both of them were killed similarly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.