जिया खान होती चार महिन्यांची गरोदर, सुरज पांचोलीने भ्रूण फेकले होते टॉयलेटमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:24 AM2020-02-20T10:24:18+5:302020-02-20T10:27:58+5:30

जिया खानचा खटला सुरू असताना सुरज आणि जियाच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या होत्या.

Jiah Khan suicide: Sooraj Pancholi extricated Jiah's foetus with own hands? | जिया खान होती चार महिन्यांची गरोदर, सुरज पांचोलीने भ्रूण फेकले होते टॉयलेटमध्ये?

जिया खान होती चार महिन्यांची गरोदर, सुरज पांचोलीने भ्रूण फेकले होते टॉयलेटमध्ये?

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१३ मध्ये जियाच्या निधनाच्या काही महिने आधी ती गरोदर होती. सुरजला ही गोष्ट तिने सांगितल्यानंतर ते दोघे डॉक्टरकडे गेले होते. जियाला डॉक्टरांनी अबॉर्शनसाठी काही औषधं लिहून दिली होती. पण ही औषधं अतिशय स्ट्राँग असल्याने तिला खूपच त्रास होत होता.

जिया खानचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 ला न्यूयॉर्कमध्ये झाला होता. अभिनयाची आवड असल्याने आपले अभिनेत्री बनण्याचे स्वप्न साकारायला ती खूपच कमी वयात मुंबईत आली आणि अतिशय कमी कालावाधीत तिला चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. जियाने तिच्या कारकिर्दीत केवळ तीनच चित्रपटात काम केले. पण या तिन्ही चित्रपटातील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले.

जियाने निशब्द या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. पहिल्याच चित्रपटात तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले. त्यानंतर गजनी, हाऊसफुल या चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या. जिया बॉलिवूडमध्ये स्थिरावत असताना अचानक तिच्या निधनाची बातमी तिच्या चाहत्यांना मिळाली. जिया खानने 3 जून 2013 ला राहात्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणाऱ्या जियाच्या मृत्यूचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. तिच्या आत्महत्या प्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेन्ड सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. जिया खान प्रकरणाचा खटला अजूनही सुरू आहे. जियाची आई राबिया खान यांच्या मते, जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. अद्याप तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

जिया खानचा खटला सुरू असताना सुरज आणि जियाच्या नात्याविषयी अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. जिया आणि सुरज अनेक महिने नात्यात होते. एवढेच नव्हे तर ती चार महिन्यांची गरोदर होती. जियाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, २०१३ मध्ये जियाच्या निधनाच्या काही महिने आधी ती गरोदर होती. सुरजला ही गोष्ट तिने सांगितल्यानंतर ते दोघे डॉक्टरकडे गेले होते. जियाला डॉक्टरांनी अबॉर्शनसाठी काही औषधं लिहून दिली होती. पण ही औषधं अतिशय स्ट्राँग असल्याने तिला खूपच त्रास होत होता. गोळ्यांनी पूर्णपणे अबॉर्शन न झाल्याने तिला रुग्णालयात लगेचच दाखल करणे आवश्यक होते. पण सुरजने तिला रुग्णालयात न देता भ्रूण स्वतःच्या हाताने काढून टॉयलेटमध्ये फेकून दिले होते.

सुरजला त्यावेळी बॉलिवूडमध्ये आपले करियर करायचे होते. जियाला रुग्णायलात दाखल केले असता ही गोष्ट मीडियापर्यंत पोहोचली असती आणि त्याचे करियर धोक्यात आले असते. त्यामुळेच त्याने ही गोष्ट केली असल्याचे मुंबई मिररने त्यांच्या वृत्तात म्हटले होते.

Web Title: Jiah Khan suicide: Sooraj Pancholi extricated Jiah's foetus with own hands?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.