​फॅशनच्या नावावर जीन्सच्या झाल्या चिंध्या! बिपाशा बासूचा चढला पारा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 05:29 AM2017-10-30T05:29:25+5:302017-10-30T10:59:25+5:30

सध्या फॅशन जगतात थॉन्ग जीन्स चर्चेत आहे. अलीकडे टोकियोमध्ये थॉन्ग जीन्स लॉन्च केली गेली. जपानी कंपनी थिबॉटने ही जीन्स ...

Jingles made in the name of fashion! Bipasha Basu climbs up !! | ​फॅशनच्या नावावर जीन्सच्या झाल्या चिंध्या! बिपाशा बासूचा चढला पारा!!

​फॅशनच्या नावावर जीन्सच्या झाल्या चिंध्या! बिपाशा बासूचा चढला पारा!!

googlenewsNext
्या फॅशन जगतात थॉन्ग जीन्स चर्चेत आहे. अलीकडे टोकियोमध्ये थॉन्ग जीन्स लॉन्च केली गेली. जपानी कंपनी थिबॉटने ही जीन्स डिझाईन केली आहे. हे डिझाईन थिबॉटच्या २०१८ समर कलेक्शनचा भाग आहे. पण लॉन्च झाल्यापासून ही जीन्स सोशल मीडियावर कायम ट्रोल होत आहे. केवळ इतकेच नाही तर या जीन्सने काही बॉलिवूड सेलिब्रिटींचेही माथे ठणकले आहे. या यादीत अभिनेत्री बिपाशा बासू हिचे नाव सगळ्यात वरचे आहे. बिपाशाने थॉन्ग जीन्स लॉन्च झालेली पाहिली अन् ती भडकलीचं.   थॉन्ग जीन्स परिधान करून रॅम्पवर उतरलेली मॉडेल पाहून तर तिचा पारा आणखीच चढला. फॅशनच्या नावाखाली जीन्सच्या अशा ‘चिंध्या’ करण्याचा प्रकार  बिपाशाला जराही रूचला नाही. मग काय? बिपाशाने थॉन्ग जीन्स घातलेल्या मॉडेलचा फोटो पोस्ट करत याबद्दलचा संताप इन्स्टाग्रामवर बोलून दाखवला.



‘फॅशनच्या नावावर....आमचे जीन्सवर प्रेम आहे. प्लीज तिच्यासोबत हे असले  प्रयोग करणे थांबवा. हे पाहणे वेदनादायी आहे. नेकेड जीन्स अजिबात आवडली नाही,’ असे बिपाशाने लिहिले.जपानी कंपनीने या जीन्सला ‘थॉन्ग’ जीन्स असे नाव दिले असले तरी सोशल मीडियाने या जीन्सला ‘नेकेड जीन्स’ असे नाव दिले आहे. अभिनेत्री ऋषी कपूर यांनीही फॅशनच्या नावावर सुरु असलेल्या असल्या प्रकाराची खिल्ली उडवली आहे.



एका फॅशन स्टोर्समधील ब्रॅन्डेड टॉप व जीन्सचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे आणि त्याखाली ‘ दोनवर एक भिकेचे कटोरे मोफत’, असे कॅप्शन दिले आहे. आता सेलिब्रिटींनीच थॉन्ग जीन्स पाहून असे नाक मुरडले असेल तर   सामान्यांची ही जीन्स पाहून काय प्रतिक्रिया असणार, याचा अंदाज न लावलेलाच बरा. फॅशनच्या नावाखाली काहीही खपवता येणार नाही, एवढाच याचा अर्थ.

ALSO READ: बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर दिसणार या चित्रपटात

बिपाशा बासू लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याची बातमी आहे.  दिग्दर्शक अंकुशच्या ‘फिरकी’ या चित्रपटात बिपाशा झळकणार आहे. विशेष म्हणजे, तिच्यासोबत या चित्रपटात तिचा लाडका हबी करणसिंग ग्रोव्हर दिसणार आहे.

Web Title: Jingles made in the name of fashion! Bipasha Basu climbs up !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.