'मणिकर्णिका'मध्ये जिशू सेनगुप्ता साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 07:40 PM2018-12-14T19:40:25+5:302018-12-14T19:40:54+5:30

अभिनेत्री कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

Jismu Sengupta plays the role of 'Manikarnika' | 'मणिकर्णिका'मध्ये जिशू सेनगुप्ता साकारणार ही भूमिका

'मणिकर्णिका'मध्ये जिशू सेनगुप्ता साकारणार ही भूमिका

googlenewsNext


अभिनेत्री कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आता या चित्रपटात महाराजा गंगाधर राव यांची भूमिका अभिनेता जिशू सेनगुप्ता साकारणार आहे. 

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटवर अकाउंटवर महाराजा गंगाधर राव यांचा लूक शेअर करून लिहिले की, 'मणिकर्णिका'मध्ये महाराजा गंगाधर राव यांच्या भूमिकेत अभिनेता जिशू सेनगुप्ता दिसणार आहे. ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर येत्या १८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. झी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट तब्बल ५० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


टीव्ही मालिकेची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करत आहे. झलकारी बाईच्या व्यक्तीरेखेत ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका करताना दिसणार आहे. सोबतच ती या चित्रपटाची सहदिग्दर्शिकाही आहे. राणी लक्ष्मीबाईचा संघर्ष, त्यांचे शौर्य असे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिंदी शिवाय हा चित्रपट तामिळ व तेलगू भाषेतही डब करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. विशेष म्हणजे, नेमक्या याच दिवशी हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ रिलीज होणार असल्याने बॉक्स आॅफिसवर हृतिक विरुद्ध कंगना असा मुकाबला पाहायला मिळणार आहे. कंगनाने ४५ दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटींग सांभाळले. यादरम्यान तिने अनेक महत्त्वपूर्ण दृश्ये नव्याने चित्रीकरण केलीत. यानंतर चित्रपटाच्या एडिटींगचा जिम्माही तिने सांभाळला. केवळ इतकेच नाही तर व्हिएफएक्स, म्युझिक व फायनल कटचे कामही तिने पाहिले.  

Web Title: Jismu Sengupta plays the role of 'Manikarnika'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.