अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 09:53 AM2024-05-31T09:53:58+5:302024-05-31T09:54:49+5:30

जितेंद्रने आपल्यासाठी लिहिलेली लांबलचक पोस्ट वाचून अनुरागनेही खास कमेंट केली आहे.

Jitendra Joshi s special post for Anurag Kashyap praising his work in cinema | अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..."

अनुराग कश्यपसाठी जितेंद्र जोशीची पोस्ट, म्हणाला, '"३ दिवसांचं शूट पण २२ वर्ष..."

लेखक, अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) लवकरच अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) सिनेमात दिसणार आहे. याआधी त्याने अनुरागच्याच 'सेक्रेड गेम्स' मध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. कॉन्स्टेबल अशोक काटेकरच्या भूमिकेत तो झळकला होता. आता जितेंद्र जोशी पुन्हा एकदा अनुराग कश्यपसोबत काम करत आहे. जितेंद्र अनुरागच्या सिनेमांचा चाहता आहे. त्याने अनुरागसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

जितेंद्र जोशीची पोस्ट

"आधी मला बकेट लिस्ट काय असते हेही माहित नव्हतं. कुठेही पोहोचायचं नव्हतं पण एक इच्छा नक्कीच होती की हा माणूस ज्याने स्वत:च्या सिनेमांमधून माझ्यातील प्रेक्षकाचा सिनेमा बघण्याचा दृष्टिकोनच बदलला, ज्याने आजच्या काळात सिनेमा असाही बनू शकतो हे फक्त मुलाखतींमधून नाही तर आपल्या सिनेमातून दाखवून दिलं तो अनुराग कश्यप. तो स्वत: अतिशय प्रतिभावान आणि अप्रतिम लेखक आहे पण यापलीकडे जाऊन आपल्या अभिनेत्यांना आणि टीमला सोबत घेऊन एक कविता रचतो. २२ वर्षांपासून मी त्याला ओळखतो. पण कधीच 'सर आपके साथ काम करना है' असं म्हणालो नाही. पण मनोमन हे ठाऊक होतं की एक दिवस येईल आणि बास....

भूमिका छोटीशी आहे, ३ दिवसांचं शूट आहे. पण मधले २२ वर्ष जोडले तर काय हिशोब लागेल माहित नाही. पण इतकं नक्कीच वाटतं की आजच्या काळात लोक प्रत्येक गोष्टीवर किंवा माणसावर हक्क दाखवतात, पण हा आपल्या कोणत्याच गोष्टीवर हक्क दाखवत नाही उलट कलाकारांना त्यांचं स्वातंत्र्य देतो. त्यातून जी कलाकृती घडते त्याचा अगदी लहान मुलासारखा आनंद घेतो.बरं झालं मी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला नाहीतर मला हा अनुभव मिळाला नसता. देव करो आणि सगळ्यांनाच हा अनुभव आणि अनुराग मिळो.

तुमची उत्सफुर्तता आणि मनातील लहान मूल जपून ठेवा. तुमचा अनुराग कपठे ना कुठे नक्कीच भेटेल. खूप प्रेम अनुराग. तू स्वत:ला कधीच ओळखू नकोस अशी माझी इच्छा आहे."

जितेंद्र जोशीच्या या सुंदर पोस्टवर अनुराग कश्यपने कमेंट करत लिहिले, 'तुझ्यासोबत काम करुन मजा आली'. चाहत्यांनीही कमेंट करत जितेंद्रचं कौतुक केलं आहे. 'दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये' अशा कमेंट्स या पोस्ट दिसत आहेत.
 

Web Title: Jitendra Joshi s special post for Anurag Kashyap praising his work in cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.