जान्हवी कपूरच्या या लूकने आठवण करून दिली श्रीदेवीची

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:12 PM2019-03-22T14:12:44+5:302019-03-22T14:15:30+5:30

श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या धडक या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

Jnanvi Kapoor reminded me of this look, Srideviichi | जान्हवी कपूरच्या या लूकने आठवण करून दिली श्रीदेवीची

जान्हवी कपूरच्या या लूकने आठवण करून दिली श्रीदेवीची

googlenewsNext
ठळक मुद्देया पुरस्कार सोहळ्यात तिने हिरव्या रंगाचा सॅटिनचा ड्रेस घातला होता आणि अगदी सोबर मेकअप केला होता. या लूकमध्ये ती तिच्या आईसारखीच दिसत होती असे अनेकांचे म्हणणे आहे. 

बॉलिवूडची ‘चांदनी’ म्हणजेच श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला श्रीदेवी यांनी दुबईत अंतिम श्वास घेतला होता.  श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या आठवणी, त्यांचे अजरामर सिनेमे कायम सिनेप्रेमींच्या मनात जिवंत असतील. श्रीदेवींचे अख्खे कुटुंब आजही या धक्यातून सावरलेले नाही. आईच्या आठवणीने जान्हवी व खुशी या दोन्ही मुली आणि पती बोनी कपूर यांचे डोळे आजही पाणावतात. 

श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या धडक या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. ती आता तख्त आणि आयएएफ पायलट गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. जान्हवीने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यातील तिच्या लूकची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या पुरस्कार सोहळ्यात तिने हिरव्या रंगाचा सॅटिनचा ड्रेस घातला होता आणि अगदी सोबर मेकअप केला होता. या लूकमध्ये ती तिच्या आईसारखीच दिसत होती असे अनेकांचे म्हणणे आहे. 

जान्हवी कपूर आपल्या आईच्या अतिशय जवळ होती. मुलीला मोठ्या पडद्यावर स्टार म्हणून बघणे हे श्रीदेवींचे स्वप्न होते. आजघडीला श्रीदेवींचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. पण जान्हवीचे स्टारपण पाहण्यासाठी श्रीदेवी या जगात नाहीत. श्रीदेवींच्या अंतिम क्षणीही जान्हवी त्यांच्यासोबत नव्हती.

आजही सोशल मीडियावर श्रीदेवींचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. दुबईतील एका कौटुंबिक सोहळ्यातील एक फोटो तर नेटिझन्सचा प्रचंड आवडता आहे. श्रीदेवी यांनी मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटववर पोस्ट केलेल्या या फोटोत त्या आपल्याला पती बोनी कपूर, मुलगी खुशी कपूर आणि कुटुंबीयातील इतर सदस्यांसोबत दिसत आहेत. श्रीदेवी या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगल्याच अ‍ॅक्टिव्ह होत्या. त्यानी त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा सगळ्यात शेवटचा फोटो आहे.

Web Title: Jnanvi Kapoor reminded me of this look, Srideviichi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.