जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ला मिळाले ए सर्टिफिकेट, हे आहे कारण!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 06:01 PM2018-08-12T18:01:32+5:302018-08-12T18:03:29+5:30

येत्या १५ आॅगस्टला जॉन अब्राहम व मनोज वाजपेयीचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट रिलीज होतोय. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ए सर्टिफिकेट (केवळ प्रौढांसाठी) दिले आहे.

john abraham and manoj bajpayee starer film satyamev Jayate gets A certificate from Censor Board | जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ला मिळाले ए सर्टिफिकेट, हे आहे कारण!!

जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ला मिळाले ए सर्टिफिकेट, हे आहे कारण!!

googlenewsNext

येत्या १५ आॅगस्टला जॉन अब्राहम व मनोज वाजपेयीचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट रिलीज होतोय. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ए सर्टिफिकेट (केवळ प्रौढांसाठी) दिले आहे. म्हणजे हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने ‘अ‍ॅडल्ट’ ठरवले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप जवेरी यांनी यास दुजोरा दिला आहे. चित्रपटातील हिंसाचाराची अनेक भडक दृश्ये आणि तेवढेच भडक शब्द यामुळे सेन्सॉर बोर्डाने हा निर्णय घेतला.
मिलाप यांनी सांगितले की,या चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळणे, अपेक्षितचं होते. कारण या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स सामान्य नाहीत. चित्रपटातील मोहरमच्या एका दृश्यही प्रचंड भडक आहे. चित्रपटात कुठलीही अश्लिल दृश्ये वा शब्द नाहीत. केवळ आणि केवळ यातील हिंसक दृश्यांमुळे सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ए सर्टिफिकेट दिले.
या चित्रपटात जॉन अब्राहम एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मनोजनेही पोलिस अधिका-याचीच भूमिका साकारली आहे. मात्र जॉन भ्रष्टाचाराविरोधात आपल्या पद्धतीने लढा देतो. अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आयशा शर्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय
खरे तर ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटावर एक वेबसीरिज बनवण्याची मिलाप यांची योजना होती. पण  दिग्दर्शक रेंजिल डिसिल्व्हा यांनी ही कथा ऐकल्यानंतर यावर वेवसीरिज नाही तर चित्रपट बनव, असा सल्ला मिलाप यांना दिला. यानंतर मिलाप यांनी चित्रपटावर काम सुरू केले. पण त्यांच्यापुढे एक अडचण होती. याआधी आलेले मिलाप यांचे सिनेमे बॉक्सआॅफिसवर आपटल्याने कुणीही बडा स्टार त्यांच्यासोबत काम करण्यास तयार नव्हता. यानंतर मिलाप यांनी वरूण धवनचा भाऊ आणि निर्माता रोहित धवन याच्यासोबत आपली ही अडचण शेअर केली. रोहित यानेच या चित्रपटासाठी जॉनचे नाव सुचवले. एक तर जॉन या चित्रपटाच्या कथेत एकदम फिट बसणार होता. शिवाय केवळ दिग्दर्शकाचा मागचा चित्रपट आपटला म्हणून त्याचा चित्रपट न स्वीकारण्याचा जॉनचा स्वभाव नव्हता. मिलाप यांनी जॉनला चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवली आणि जॉन लगेच या चित्रपटासाठी तयार झाला.

Web Title: john abraham and manoj bajpayee starer film satyamev Jayate gets A certificate from Censor Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.