फिटनेससाठी जॉन अब्राहमनं सोडला 'हा' पदार्थ; २५ वर्षांपासून हातही नाही लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:29 IST2025-02-27T11:28:48+5:302025-02-27T11:29:27+5:30

अभिनेत्याच्या फिटनेसविषयी एक शॉकिंग माहिती समोर आली आहे.

John Abraham Fitness Regimen He Never Tasted Sugar In 25 Years Doesn't Drink Or Smoke | फिटनेससाठी जॉन अब्राहमनं सोडला 'हा' पदार्थ; २५ वर्षांपासून हातही नाही लावला

फिटनेससाठी जॉन अब्राहमनं सोडला 'हा' पदार्थ; २५ वर्षांपासून हातही नाही लावला

John Abraham Fitness: बॉलिवूडमध्ये फिटनेस फ्रिक कलाकारांची कमी नाही. प्रत्येक कलाकार स्वत:ला फिट ठेवण्यासाठी स्क्रिनवर छान दिसण्यासाठी मेहनत घेत असतो. जॉन अब्राहम (John Abraham) बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची खास ओळख फिट (Fit Actor) अभिनेता म्हणून केली जाते. व्यायामासह तो आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष देतो. त्याने अनेक वर्ष आपल्या फिटनेसला मेन्टेन ठेवलंय. शिवाय तो डाएटमध्ये कोणतीही तडजोड करीत नाही. अभिनेत्याच्या फिटनेसविषयी एक शॉकिंग माहिती समोर आली आहे. एखाद्या गोष्टीबद्दल असलेलं त्याचं डेडिकेशन पाहायला मिळालंय. 

 जॉन अब्राहम हा फिटनेससाठी काही गोष्टी कटाक्षानं पाळतो. फिटनेससाठी डाएट देखील महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी आपल्या अनेक आवडत्या गोष्टींचा पदार्थांचा त्याग करावा लागतो. एकदा डाएट चार्ट रुळावर आल्यानंतर बऱ्याचा चिट डे देखील असतो. पण, जॉन अब्राहमनं त्याचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी तब्बल २५ वर्ष त्याचा आवडीचा एक पदार्थ खाल्ला नाही.  जॉन अब्राहमने गेल्या २५ वर्षांपासून साखरेचा एक दाणाही तोंडला लावलेला नाही.  विशेष म्हणजे जॉनने गेल्या २५ वर्षात एकही चीट मील किंवा चीट डे केलेले नाही. वर्कआउट, स्पोर्ट्स ट्रेनिंग आणि डाएट प्लॅनही तो फॉलो करतो.  यासोबतच तो मद्यपान किंवा धूम्रपान करत नाही.


जॉन अब्राहम फिटनेसच्या बाबतीत सर्वांचा आवडता स्टार आहे. दररोज त्याचे काही ना काही फोटो सोशल मीडियावर येत राहतात. जॉन अब्राहम हा अलिकडेच २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेदा' या सिनेमात तो दिसला होता. आता २०२५ मध्ये 'द डिप्लोमॅट' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  हा चित्रपट (John Abraham Movies) देशाला हादरवून सोडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित आहे. अलिकडेच चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाणी प्रदर्शित झाल्यानंतर 'द डिप्लोमॅट'बाबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. येत्या १४  मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार होता.

Web Title: John Abraham Fitness Regimen He Never Tasted Sugar In 25 Years Doesn't Drink Or Smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.