​जॉन अब्राहम नाही,कार्तिक आर्यन बनणार ‘चोर’!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 10:12 AM2017-06-30T10:12:57+5:302017-06-30T15:42:57+5:30

‘प्यार का पंचनामा’ फेम कार्तिक आर्यन याची जॉन अब्राहमच्या जागेवर वर्णी लागली आहे. होय, ‘चोर निकल के भागा’ या ...

John Abraham, Karthik Aryan to become 'thief'! | ​जॉन अब्राहम नाही,कार्तिक आर्यन बनणार ‘चोर’!

​जॉन अब्राहम नाही,कार्तिक आर्यन बनणार ‘चोर’!

googlenewsNext
्यार का पंचनामा’ फेम कार्तिक आर्यन याची जॉन अब्राहमच्या जागेवर वर्णी लागली आहे. होय, ‘चोर निकल के भागा’ या चित्रपटात आता जॉन नाही तर कार्तिक आर्यन दिसणार आहे. मेकर्ससोबतच्या मतभेदानंतर जॉनने हा चित्रपट सोडा होता. आता या मतभेदाचे कारण अद्याप समजलेले नाही. पण निर्मात्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता जॉन गेल्यावर नव्या हिरोचा शोध सुरु होणारच. हा शोध कार्तिक जवळ येऊन थांबल्याचे कळतेय. यात कार्तिक लीड रोलमध्ये दिसेल. हिºयाच्या चोरीवर आधारित या चित्रपटाचे शूटींग यावर्षीच्या अखेरिस सुरु होणार आहे. 
अर्थात शूटींग सुरु होण्यासाठी मेकर्सला आणखी एका दिव्यातून जावे लागणार आहे. ते म्हणजे हिरोईनचा शोध. सर्वप्रथम या चित्रपटासाठी तमन्ना भाटियाचे नाव फायनल झाले होते. पण जॉन प्रमाणेच तिनेही या चित्रपटातून काढता पाय घेतला. तमन्नाच्या एक्झिटनंतर आता मेकर्सला या चित्रपटासाठी नव्या फिमेल लीडचा शोध आहे. राजकुमार राव हाही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 
कार्तिक आर्यन सध्या ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटात बिझी आहे. अश्विनी धीर दिग्दर्शित या चित्रपटात किर्ती खरबंदा, परेश रावल आणि तन्वी आझमी मुख्य भूमिकेत आहेत. 
कार्तिकने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात त्याने रजत नामक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कार्तिकला सलग पाच मिनिटं न थांबता संवाद बोलायचा होता. हा संवाद हिंदी चित्रपटातील सर्वात लांब संवाद मानला जातो.

Web Title: John Abraham, Karthik Aryan to become 'thief'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.