साया चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान थोडक्यात वाचला होता जॉन अब्राहम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 11:17 AM2017-09-12T11:17:53+5:302017-09-13T09:57:17+5:30

जॉन अब्राहम इंडस्टीमध्ये आपल्या माचो इमेजसाठी फेसम आहे. जॉनला एक्शन- थ्रीलर चित्रपटात काम करायला जास्त आवडते. स्टंट करणे ही ...

John Abraham, who had read briefly during the shooting of Saya film | साया चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान थोडक्यात वाचला होता जॉन अब्राहम

साया चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान थोडक्यात वाचला होता जॉन अब्राहम

googlenewsNext
न अब्राहम इंडस्टीमध्ये आपल्या माचो इमेजसाठी फेसम आहे. जॉनला एक्शन- थ्रीलर चित्रपटात काम करायला जास्त आवडते. स्टंट करणे ही जॉनला आवडते. मात्र असाच एका चित्रपटातील स्टंट जॉनच्या जीवाववर बेतणार होता. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान मृत्यूच्या जबड्यातून जाऊन जॉन परतला आहे. शूटिंगच्या वेळी जॉनचा तोल 100 फूटांवरुन जॉन जात-जात राहिला आहे.  

जॉनने दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता. हा अपघात त्याचा दुसरा चित्रपट साया दरम्यान झाला होता. हा चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासूने केले होते. चित्रपटाचा क्लामैक्स शूट करण्यात येत होता. या सीनमध्ये जॉनला पाण्यात उडी मारुन पोहण्याची अक्टिंग करायची होती. तेव्हा जॉन बेशुद्ध झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॉन 100 फूटांच्या धबधब्यापासून 10 फूटांवरच होता.  हे बघून जॉनला वाचवण्यासाठी त्याचा सहकलाकार राज जुत्शीने पाण्यात उडी मारली होती. सगळ्यात आधीने त्यांने तारेच्या मदतीने जॉनचे पाय बांधले होते. यानंतर तो मला पोहोता येत नाही असे सांगायला लागला. हे ऐकून जॉनला सुद्धा धक्का बसला. मात्र कसबस दोघे किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचले. जॉन त्या क्षणापासून हा त्याचा पुर्नजन्म मानतो.

ALSO READ : जॉन अब्राहमचा ‘हा’ फोटो होत आहे व्हायरल; पण का? जाणून घ्या त्यामागील कारण!
         
जॉनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. जिस्म चित्रपटातून त्यांने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 2012 मध्ये आलेल्या विकी डोनर चित्रपटातून त्यांने निर्मिती श्रेत्रात पदार्पण केले होते.  आयुषमान खुराणा स्टारर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. जॉनच्या प्रॉडक्शन हाऊस तर्फे मद्रास कैफे या दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. सध्या जॉन त्याचा आगामी चित्रपट  'परमाणु द स्टोरी ऑफ पोखरणमध्ये बिझी आहे. हा ही चित्रपट त्याच्याच प्रोडक्शन हाऊस अतंर्गत तयार करण्यात येतो आहे.  परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण चित्रपटाची कथा राजस्थानच्या पोखरणमध्ये झालेल्या परमाणु परीक्षणावर आधारित आहे. यात जॉनसह बोमन इराणी आणि डायना पेंटी यांच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहे. 8 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: John Abraham, who had read briefly during the shooting of Saya film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.