जॉन अब्राहम दिसणार 'या' चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 05:43 AM2017-06-15T05:43:36+5:302017-06-15T11:13:36+5:30

'परमाणु-द स्टोरी ऑफ पोखरण' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जॉन अब्राहम जोधपुरला पोहोचला आहे. जॉनच्या फॅन्सने त्याचे एअरपोर्टवर मोठ्या उत्साहात ...

John Abraham will appear in the film ' | जॉन अब्राहम दिसणार 'या' चित्रपटात

जॉन अब्राहम दिसणार 'या' चित्रपटात

googlenewsNext
'
;परमाणु-द स्टोरी ऑफ पोखरण' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी जॉन अब्राहम जोधपुरला पोहोचला आहे. जॉनच्या फॅन्सने त्याचे एअरपोर्टवर मोठ्या उत्साहात स्वागत केले. मोठ्या संख्येने फॅन्स त्याच्या स्वागतासाठी एअरपोर्टवर दाखल झाले होते. अनेक फॅन्सनी यावेळी त्याच्यासोबत सेल्फिदेखील काढला. यानंतर जोधपुरच्या रस्त्यावर जॉन पोखरणच्या दिशेने रवाना झाला. या चित्रपटासाठी 3 वर्षांपेक्षा जास्त वेळ संशोधन चालू आहे.  या चित्रपटाची पटकथा जॉन ऑफिसच्या ऑफिसमध्ये तयार करण्यात आली. 1998 साली दुसऱ्या परमाणु परीक्षणावर हा चित्रपट तयार करण्यात येतोय. या चित्रपटाचा मोठ्या भाग भारतात झालेल्या दुसऱ्या परमाणु परीक्षण 'पोखरण 2'वर आधारलेला असल्याचे कळतेय.    

जॉनचे प्रॉडक्शन हाऊस जे ए एंटरटेनमेंट हा चित्रपटत तयार करतोय. परमाणु-द स्टोरी ऑफ पोखरणचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करतोय. अभिषेक तेरे बिन लादेन आणि डेड और अलाइव या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा सैविन कदरोस आणि संयुक्ता चावल शेख यांनी लिहिली आहे. याआधी नीरजा चित्रपटाची कथा यांनी लिहिली आहे. आधी या चित्रपटाचे नाव शांतिवन असणार होते मात्र त्यानंतर यात बद्दल करुन ते  परमाणु-द स्टोरी ऑफ पोखरण असे करण्यात आले.  जॉन अब्राहम, बोमन इराणी आणि डायना पेंटी यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.  मुंबईतल्या अनेक भागात या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे मढ, चर्चगेट आणि वडाळा फोर्टमध्ये या चित्रपटाचा काही भाग शूट करण्यात आला आहे.  चित्रपटाच्या मुहुर्ताचे  जॉन त्याच्या ट्विटर अकांऊटवर चित्रपटाच्या शेअर केला होता.  8 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: John Abraham will appear in the film '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.