पुन्हा विषयच हार्ड! 'छावा'नंतर आता मार्चमध्येच रिलीज होत आहेत 'हे' २ बिग बजेटचे चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:50 IST2025-03-04T15:47:16+5:302025-03-04T15:50:49+5:30
'छावा' चित्रपटानंतर हे सिनेमे बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्की आहे.

पुन्हा विषयच हार्ड! 'छावा'नंतर आता मार्चमध्येच रिलीज होत आहेत 'हे' २ बिग बजेटचे चित्रपट
अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे. बॉलिवूडसाठी हे २०२५ वर्ष खास ठरणार असल्याचं दिसतयं. अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटानं नव्या वर्षाची दमदार ओपनिंग केली आहे. 'छावा'नं कलेली सुरूवात बाॅलिवूडसाठी चांगली नक्कीच ठरलीय. आता 'छावा' चित्रपटानंतर या मार्च महिन्यात दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे सिनेमे बाॅक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्की आहे.
मार्च २०२५ मध्ये बाॅलिवूडचे दोन बिग बजेटचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात पहिला चित्रपट आहे 'द डिप्लोमॅट'. अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) 'द डिप्लोमॅट' सिनेमा १४ मार्च रोजी रिलीज होत आहे. डिप्लोमॅट जितेंद्र पाल सिंह यांच्यावर सिनेमा आधारित आहे. यामध्ये जॉन त्यांचीच भूमिका साकारत आहे. सिनेमात पाकिस्तानात राहणाऱ्या उज्मा अहमद या भारतीय मुलीच्या सुटकेची गोष्ट दाखवण्यात आली आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट बॉक्स गाजवेल, यात शंका नाही.
'द डिप्लोमॅट'नंतर बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान (Salman Khan) याचा सिंकदर हा चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. हा बिग बजेटचा चित्रपट आहे. यंदा बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड हा चित्रपट मोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट येत्या २८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यात सलमान खानच्या सोबतीला रश्मिका मंदाना ही अभिनेत्री दिसणार आहे. सोबतच सत्यराज शरमन जोशी, प्रतिक बब्बर आदी अभिनेतेही या चित्रपटात दिसतील.