पाहा कॉमेडी किंग जॉनी लिव्हरच्या कुटुंबाचे फोटो, मुलगा आणि मुलगी हुबेहुब दिसतात जॉनीसारखे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 11:42 AM2020-04-14T11:42:44+5:302020-04-14T11:46:17+5:30
जॉनी लिव्हरची मुलगी जीमीने त्याच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे तर त्याचा मुलगा जेसीने देखील काही कॉमेडी शो केले असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे.
कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत कॉमेडीचा बादशाह जॉनी लिव्हर आजही तमाम रसिकांचे मनोरंजन करत असतो. कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर जॉनी लिव्हरने बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. अन् अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे तो आजही सा-यांच्या मनजावर राज्य करतोय. जेव्हा जेव्हा कॉमेडीचा विषय निघतो तेव्हा डोळ्यासमोर सर्वात आधी फक्त आणि फक्त जॉनी लिव्हरचा चेहरा डोळ्यासमोर येतो. स्टँडअप कॉमेडीला खरी ओळख जॉनी लिव्हरनेच मिळवून दिली आहे. जॉनी लिव्हरपासून प्रेरणा घेत अनेक कलाकार आज कॉमेडी करत आपले करिअर घडवत आहे. यांतील काही कपिल शर्मा, सुनिल ग्रोव्हर बनले तर काही आजही नशीब आजमवत आहे.
इतरांप्रमाणे जॉनीदेखील सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो. नुकतंच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो दोन्ही मुलं आणि त्याची पत्नीसह पाहायला मिळत आहे. जॉनी लिव्हरचा हा कुटुंबाचा फोटो पाहून चाहते लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव करत आहेत.
सध्या कुटुंबासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना पाहायला मिळतोय. चाहत्यांसाठी सर्व कुटुंब एकत्र पाहणे हा नक्कीच दुर्मिळ क्षण असून ख-या अर्थाने हा फोटो स्पेशल ठरत आहे.
जॉनी लिव्हरची मुलगी जीमीने त्याच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे तर त्याचा मुलगा जेसीने देखील काही कॉमेडी शो केले असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे. जॉनीच्या पत्नीचे नाव सुजाता असून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात ती तिच्या पाठिशी उभी राहिली आहे. तसेच जॉनी आज जे काही मिळवले आहे त्याचे श्रेय तो कुटुंबाला देतो.