जॉली गुड फेलो : अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’चे प्रमोशनल साँग रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2017 09:52 PM2017-01-19T21:52:14+5:302017-01-19T21:52:14+5:30
‘जॉली एलएलबी २’ मधील प्रमोशनल सॉग ‘जॉली गुड फेलो’ रिलिज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गाण्याची प्रेरणा अक्षयला त्याची मुलगी नितारा हिच्यापासून घेतली आहे,
ब लिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नव्या वर्षांत धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या वर्षी त्याचे चार सिनेमे प्रदर्शित होत असून यावर्षीचा पहिला चित्रपट ‘जॉली एलएलबी २’ मधील प्रमोशनल सॉग ‘जॉली गुड फेलो’ रिलिज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गाण्याची प्रेरणा अक्षयला त्याची मुलगी नितारा हिच्यापासून घेतली आहे,
‘जॉली एलएलबी २’ मधील हे गाणे प्रमोशनल साँग असून या गाण्याला मीत ब्रदर्सने (मनमीत सिंग व हरमीत सिंग) संगीतबद्ध केले असून त्यांनीच आपला आवाजात गायले आहे. शब्बीर अहमद यांने या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. या गाण्यात चित्रपटातील विविध दृष्यांचे एकत्रीकरण करण्यात आले असून गाणे पाहताना मजेदार प्रसंग दाखविण्यात आले आहेत. जॉली एलएलबी २ या चित्रपटात अक्षय कुमार एका वकिलाची भूमिका करीत आहे. या गाण्यात अक्षयसोबत हुमा कुरेशी व सौरव शुक्ला दिसत आहेत. हे गाणे पाहणे मजेदार आहे. Read More : अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी २’ मधील गाण्यामागचे गुपीत?
काही दिवसांपूर्वी ‘जॉली एलएलबी २’च्या प्रमोशनसाठी एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले असल्याचे अक्षय कुमार याने सांगितले होते. ‘एक दिवस अक्षय आपली मुलगी नितारासोबत खेळत असताना तिने तिला नर्सरीत शिकवलेली एक राईम्स गाऊ लागली. ‘ही इज अ जॉली गुड फेलो’ असे या गीताचे बोल होते. हे शब्द काणी पडताच अक्षयने आपल्या आगामची चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा मुखडा वापरता येईल असा अंदाज लावला, असे सांगितले होते. Read More : Just Go Pagal !! ‘जॉली एलएलबी2’चे हे गाणे ऐकून तुम्हीही व्हाल पागल..
अक्षय कुमारने अशा मुखड्यांचा वापर प्रथमच केला असे नाही. यापूर्वी त्याच्या इंटरटेनमेंट या चित्रपटात ‘जॉनी जॉनी यस पापा’ या गाण्याच्या धरतीवर ‘मैने पी नही है’ हे गाणे करण्याचा सल्ला दिग्दर्शकाला दिला होता. अक्षय कुमार, हुमा कुरेशी व अन्नू कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट १० फेब्रुवारीला रिलीज होत आहे.
Realeted Articale
‘जॉली एलएलबी २’ आणि ‘जॉली एलएलबी’मध्ये आहेत ‘या’ काही कॉमन गोष्टी...!
‘जॉली एलएलबी २’ : अक्षय कुमारसह सहा जणांना कायदेशीर नोटीस