Kangana Ranaut : कंगना राणौत यांचं भाजपात स्वागत आहे पण तिकिट हवं असेल तर.., जेपी नड्डा स्पष्टचं बोलले...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 10:58 AM2022-10-30T10:58:57+5:302022-10-30T10:59:45+5:30
Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना राणौत राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. काल-परवा तिने तसे संकेतच दिलेत. आता कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची प्रतिक्रिया आली आहे.
Kangana Ranaut Will Contest Election : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut ) राजकारणात येण्यासाठी उत्सुक आहे. काल-परवा तिने तसे संकेतच दिलेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातूनभाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची इच्छा तिने व्यक्त केली. ‘जनतेची इच्छा असेल आणि भाजपाने तिकिट दिल्यास मी निवडणूक लढवायला तयार आहे’, असं कंगना म्हणाली. आता कंगनाच्या या वक्तव्यावर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda ) यांची प्रतिक्रिया आली आहे.
शिमला येथे शनिवारी ‘पंचायत आतक’मध्ये नड्डा याावर बोलले. कंगना राणौत भाजपात येण्यास इच्छूक असतील तर त्यांचं स्वागत आहे. अर्थात निवडणूक लढवण्याबाबतचा निर्णय माझ्या एकट्याचा नसेल, असं नड्डा म्हणाले.
ते म्हणाले, कंगना राणौत भाजपात येणार असतील तर त्यांचं भाजपात स्वागत आहे. त्यांनी पक्षात यावे. पक्षासाठी काम करण्याची इच्छा असलेल्यांचं पक्षाने नेहमीच स्वागत केलं आहे. अशा प्रत्येकासाठी भाजपात जागा आहे. मात्र कंगना यांनी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, हा निर्णय मी एकटा घेऊन शकत नाही. त्यासाठी एक प्रक्रिया निश्चित केलेली आहे आणि त्यानुसारच निर्णय घेतला जाईल. पक्ष त्यांच्याबद्दल योग्यवेळी निर्णय घेईल. कोणालाही आम्ही अटींसह स्वीकारत नाही. कोणालाही आश्वासन देत नाही. बिनशर्त येणाऱ्याबद्दल पक्ष विचार करतो. आमच्या पक्षात सर्वांचं स्वागत आहे मात्र त्या व्यक्तीला कोणती जबाबदारी द्यावी, याचा निर्णय पक्ष घेईल, असंही ते म्हणाले.
काय म्हणाली होती कंगना?
भाजप सरकारला माझी साथ हवी असेल तर मी सर्व प्रकारे मदतीसाठी तयार आहे. हिमाचल प्रदेशच्या जनतेने मला सेवेची संधी दिली तर चांगले होईल. माझ्यासाठी हे सौभाग्य असेल, अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली होती. बॉलिवूड आणि राजकारणातील घडामोंडीवर कंगना तिचं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा ती वाद ओढवून घेते. कंगना राजकारणात येणार, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाने हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.