आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो ज्युनियर एनटीआर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 08:00 AM2023-05-20T08:00:00+5:302023-05-20T08:00:02+5:30

ज्युनियर एनटीआरची जगभरात फॅन फॉलोईंग आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांना तो टक्कर देतो. चाहत्यांना त्याच्या पर्सनल लाईफबाबात जाणून घेण्याची इच्छा आहे.

Jr ntr birthday special lifestyle luxury house car collection net worth | आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो ज्युनियर एनटीआर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

आलिशान बंगला, लग्झरी कार, राजेशाही थाटात जगतो ज्युनियर एनटीआर, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक

googlenewsNext

साऊथचा अभिनेता ज्युनियर एनटीआर याला कोणत्याची परिचयाची गरज नाही. जगभरात त्याची फॅन फॉलोईंग आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांना तो टक्कर देतो. चाहत्यांना त्याच्या पर्सनल लाईफबाबात जाणून घेण्याची इच्छा आहे. न्युनिअर एनटीआर आज त्याचा 40 वाढदिवस साजरा करतोय. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याची लग्झरी लाईफस्टाईलबाबत.  

ज्युनियर एनटीआर साऊथमधील महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ज्यांची फॅन फॉलोईंगही खूप जबरदस्त आहे. 
फार कमी लोकांना माहित आहे की ज्युनियर एनटीआरचे पूर्ण नाव नंदा मूर्ती तारका रामा राव आहे. ते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे नातू आहे. 

1 ज्युनियर एनटीआरने 2001 मध्ये 'स्टुडंट नंबर 1'पासून आपल्या करिअरची सुरुवात केलीराम चरण आणि चिरंजीवी ज्युनियर हे एनटीआरचे शेजारी आहेत.हैदराबादमधील ज्युबिली हिल्समधील लक्झरी बंगल्यात ज्युनियर एनटीआर कुटुंबासमवेत राहतो. या घराची किंमत सुमारे 25 कोटी आहे.  याशिवाय बंगळुरु आणि कर्नाटकमध्येही त्यांच्याकडे अनेक लक्झरी घरे आहेत.

एनटीआरने त्याच्या चित्रपटांमध्ये केलेल्या उत्कृष्ट अभिनयासाठी नंदी पुरस्कार, आयफा पुरस्कार, फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट तेलगू अॅवॉर्ड जिंकला आहे. ऑस्करमध्ये त्याच्या आर. आर चिटातील नाटू नाटू गाण्याने बेस्ट ओरिजनल साँगचा ऑस्कर जिंकला. ज्युनियर एनटीआर 9999 क्रमांकास लकी मानते. त्याच्याकडे एकाच नंबरच्या बर्‍याच गाड्या आहेत. ज्युनियर एनटीआरने आपल्या कार बीएमडब्ल्यूच्या नोंदणीसाठी फॅन्सी नंबर 9999 वर 11 लाखांची बोली लावली होती.  त्याबद्दल तो खूप चर्चेत देखील आला होता.

Web Title: Jr ntr birthday special lifestyle luxury house car collection net worth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.