मी सलमानला रिजेक्ट केले होते...! जुही चावलाने उडवली सलमान, शाहरूख, माधुरीची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 01:07 PM2021-05-23T13:07:44+5:302021-05-23T13:08:19+5:30
लाईव्ह शोमध्ये हे काय बोलली जुही चावला? व्हिडीओ पाहून व्हाल हैराण
90 च्या दशकात एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारी अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिने आमिर खान व शाहरूखसोबत एकापेक्षा एक हिट सिनेमे दिलेत. पण सलमान खानसोबत ( Salman Khan) हिरोईन म्हणून तिने एकही सिनेमा केला नाही. याचे कारण माहितीये? तर जुही चावला खुद्द सलमानला रिजेक्ट केले होते. होय, ‘एंटरटेनमेंट की रात’ या शोमध्ये खुद्द जुहीने याचा खुलासा केला होता. इतकेच नाही तर या शोमध्ये जुही सलमान, शाहरूखची (Shahrukh Khan) जबरदस्त खिल्ली उडवताना दिसली होती.
मी त्याला रिजेक्ट केले...
सलमानसोबत तू एकही सिनेमा का केला नाहीस? असा प्रश्न या शोवर तिला विचारण्यात आला. यावर मी सलमानला रिजेक्ट केले होते. पुढे सलमान सुपरस्टार बनला आणि नंतर त्याने माझ्याशी काम करायला नकार दिला, असा खुलासा तिने या शोमध्ये केला. मी ज्यांनाही रिजेक्ट केले, ते सुपरस्टार बनलेत, हे सांगायलाही ती विसरली नाही.
हा कोणत्या अँगलने आमिर दिसतो...
शाहरूखबद्दलही जुही बोलली. शाहरूख... फौजीमधला एक मुलगा माझा हिरो असल्याचे निर्मात्यांनी मला सांगितले. तो अगदी आमिरसारखा दिसतो, तो असा आहे, तसा आहे, असे निर्मात्यांनी वाढवून चढवून मला सांगितले. मी सेटवर गेली. एक सडपातळ मुलगा माझ्यासमोर उभा होता. सडपातळ, व्हाईट शर्ट घातलेला एक मुलगा. डोळ्यांपर्यंत केस आणि त्याचा तो अवतार पाहून हा आणि आमीर खान? हा कुठल्या अँगलने आमिर दिसतो?असा प्रश्न मला पडला होता. पण मी सिनेमा साईन केला होता आणि त्यामुळे मला त्याच्यासोबत सिनेमा करावा लागला, असे जुही यावेळी म्हणाली. मी त्याच्यासोबत सिनेमा केला आणि तो सुपरस्टार बनला. आता शाहरूख व जुहीचा हा कोणता सिनेमा होता तर ‘राजू बन गया जेंटनमॅन’.
माधुरीचीही उडवली खिल्ली
दिल पागल है या सिनेमाबद्दल जुहीने सांगितले. ‘दिल तो पागल है’ हा सिनेमा आधी मला ऑफर झाला होता. पण मी तो रिजेक्ट केला. कारण त्यांनी मला माधुरीचा नाही तर करिश्माचा रोल ऑफर केला होता. मी नाही म्हटले. माधुरी लीड रोलमध्ये आणि मी सेकंड रोलमध्ये, शक्यच नव्हते. म्हणून मी तो सिनेमा नाकारला आणि मी नाकारला म्हणून माधुरी व करिश्मा सुपरस्टार बनल्या, असे जुही म्हणाली.