माधुरी व जुहीनं का केलं नाही हँडसम मुव्ही स्टारसोबत लग्न? या व्हिडीओत मिळेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 09:08 PM2021-05-30T21:08:16+5:302021-05-30T21:09:18+5:30

माधुरी दीक्षित व जुही चावला या दोन्ही अभिनेत्रींचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आता या व्हिडीओत काय खास असे विचाराल तर एका प्रश्नाचे उत्तर.

juhi chawla madhuri dixit didnt get married with handsome movie star reveals- | माधुरी व जुहीनं का केलं नाही हँडसम मुव्ही स्टारसोबत लग्न? या व्हिडीओत मिळेल उत्तर

माधुरी व जुहीनं का केलं नाही हँडसम मुव्ही स्टारसोबत लग्न? या व्हिडीओत मिळेल उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देमाधुरीने 1999 साली डॉक्टर असलेल्या श्रीराम नेने यांसोबत विवाह केला तर जुहीने 1995 साली बिसनेसमन जय मेहता यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) व जुही चावला (Juhi Chawla ) यांनी एककाळ गाजवला. माधुरी चाहत्यांच्या ‘दिलाची धडकन’ तर जुही चावला म्हणजे चाहत्यांचे ‘इश्क’. जुही चावला सध्या चित्रपटांपासून दूर आहे तर माधुरी रिअ‍ॅलिटी शो जज करतेय. तूर्तास या दोन्ही अभिनेत्रींचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आता या व्हिडीओत काय खास असे विचाराल तर एका प्रश्नाचे उत्तर.
होय, जुही व माधुरीने एखाद्या हँडसम मुव्ही स्टारसोबत लग्न का केलं नाही? याचे उत्तर जुही व माधुरीने या व्हिडीओत दिलं आहे.
करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमधील हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. 2014 मध्ये   जुही आणि माधुरी यांनी ‘कॉफी विथ करण’ मध्ये हजेरी लावली तेव्हा करणने दोघींनाही एकच प्रश्न विचारला होता.


 
जुही म्हणाली, नो हिरो...

इतक्या हँडसम हिरोंसोबत काम करूनही जुहीला एकही हिरो भावला नाही, याचे कारण काय तर तिला मुळातच अभिनेत्यासोबत लग्न करायचं नव्हतं. तिने सांगितले, जय मेहता खरोखर मला आवडले होते. ते माझ्यासाठी फुलं पाठवायचे, ग्रीटींग्स पाठवायचे. त्यांनी माझे मनं जिंकले होते. सर्व हिरो हँडसम होते, आहेत. पण मी एक अभिनेत्री होते आणि त्यामुळेच  कदाचित आणखी एका अभिनेत्याला मी आयुष्यात सहन करू शकले नसते, मी एकदम क्लिअर होते. अ‍ॅक्टिंगमध्ये आपण स्वत:तच रमलेले, हरवलेलो असतो. त्यामुळे जोडीदार म्हणून मला अभिनेता नको होता.

माझा नवरा हाच माझा हिरो...

माधुरीने तर माझा नवरा हाच माझ्यासाठी हिरो असल्याचे म्हटले होते. मी शाहरुख खान, सलमान खान सोबत खूप चित्रपट केले. आमिर खानसोबत दोनच चित्रपट केले परंतु, मला त्यांच्यापैकी एकही इतका आवडला नाही ज्याच्यासोबत मी लग्न करू शकेन. माझा नवराच माझ्यासाठी हिरो आहे, असे तिने सांगितले होते.
माधुरीने 1999 साली डॉक्टर असलेल्या श्रीराम नेने यांसोबत विवाह केला तर जुहीने 1995 साली बिसनेसमन जय मेहता यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती.
 

Web Title: juhi chawla madhuri dixit didnt get married with handsome movie star reveals-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.