विकी-कतरिनाच्या लग्नाची गुगलला झाली घाई; पती-पत्नी म्हणून नात्यावर केला शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 03:30 PM2021-12-09T15:30:53+5:302021-12-09T15:31:34+5:30
Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: अजुनतरी विकी-कतरिनाने त्यांच्या लग्नाच्या बातमीवर कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ आणि विकी कौशल राजस्थानमध्ये सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा पॅलेसमध्ये शाही पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नानंतर कतरिना आणि विकी बॉलिवूडच्या पॉवर कपल्सच्या यादीत सामील होणार हे मात्र नक्की. समोर आलेल्या मुहूर्तानुसार आज दोघांचे विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आली. सकाळपासून लग्नाच्या मुहूर्तावरही चर्चा सुरु होत्या, आज दुपारी ठीक 3:30 ते 3:45 च्या दरम्यान सात फेरे घेत पती पत्नीच्या बंधनात अडकतील अशी माहिती समोर आली होती.
अजुनतरी विकी-कतरिनाने त्यांच्या लग्नाच्या बातमीवर कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्या आधीच विकी आणि कतरिना यांच्या नात्याला विकिपीडियाने शिक्कामोर्तब करुन टाकले आहे. लग्नापूर्वीच दोघांचे नाते पती पत्नीचे असल्याचे थेट गुगलनेच जाहीर करुन टाकले आहे.
विकिपीडियावर कतरिना कैफच्या प्रोफाइलमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. कतरिनाच्या प्रोफाइलमध्ये पतीचे नावही जोडले गेले आहे. ज्यामध्ये तिच्या पार्टनचे नाव विकी कौशलचे अपडेट केले गेले आहे. त्याचबरोबर विकी कौशलच्या प्रोफाईलमध्येही असाच बदल करण्यात आला आहे. पत्नी म्हणून कतरिना कैफचे नाव अपडेट केल्याचे पाहायला मिळेल. हे पाहून विकी-कतरिनाचे चाहते खूप खूश झाले आहेत.
समोर आलेल्या काही अपडेटनुसार त्यांच्या लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लग्नापूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. दोघांनी मुंबईतच कोर्ट मॅरेज केले होते. या दोघांच्या लग्नाची तयारी महिन्याभरापूर्वीच सुरु करण्यात आली होती. शाही पद्धतीने पार पडणा-या लग्नात कोणत्याही गोष्टीची कमी राहू नये म्हणून छोट्यातल्या छोट्या गोष्टींवर बारकाईने लक्ष दिले गेले होते. कतरिनाच्या हातावर लागणारी मेहंदीचीही चर्चा रंगली होती.
कतरिना कैफच्या लग्नासाठी सोजत येथून 20 किलो मेंदी पावडर आणि 400 कोन मेंदी मागवण्यात आली होती. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या महिनाभर आधी सोजत येथील मेंदी व्यावसायिक नितेश अग्रवाल यांना लग्नात मेंदी लावण्याची ऑर्डर देण्यात आली होती. याशिवाय या दोघांच्या लग्नासाठी भाजीपाल्यापासून इतर महत्त्वाच्या गोष्टी देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर परदेशातूनही आयात करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.