Kaali poster: देवीच्या एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात LGBTचा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरवरुन वाद; नेटकरी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 02:38 PM2022-07-04T14:38:07+5:302022-07-04T14:39:26+5:30

Kaali Documentry Poster: भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी 2 जुलै रोजी त्यांच्या 'काली'चे पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये 'मां काली'च्या हातात सिगारेट आणि एलजीबीटीचा झेंडा पाहून लोक संतापले आहेत.

Kaali poster: Goddess holding a cigarette in one hand and LGBT flag in the other, Netizens got angry over the movie poster | Kaali poster: देवीच्या एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात LGBTचा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरवरुन वाद; नेटकरी भडकले

Kaali poster: देवीच्या एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात LGBTचा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरवरुन वाद; नेटकरी भडकले

googlenewsNext

Kaali poster: 'काली' या माहितीपटाच्या(Documentry) पोस्टरवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाचे पोस्टर भारतीय चित्रपट निर्मात्या-दिग्दर्शक लीना मनिमेकलाई यांनी 2 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये 'मां काली'(देवी) सिगारेट ओढताना दाखवण्यात आली आहे.

एवढेच नाही तर देवीच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात एलजीबीटी(LGBT) समुदायाचा रंगीत ध्वज आहे. या दोन गोष्टींवरून वाद निर्माण झाला आहे. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर लीना मणिमेकलाई यांना अटक करण्याची मागणी युजर्स करत आहेत.

सोशल मीडियावर लोक चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलई यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत. लीना मनिमेकलाई यांच्या अटकेची मागणीही अनेकजण करत आहेत. #arrestleenamanimekalai सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. पोस्टरमध्ये निर्मात्यांनी माँ कालीचा अपमान केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. लीना मनिमेकलाई यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे.

चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या माहितीपटाचे पोस्टर शेअर करताना सांगितले की, तिचा चित्रपट कॅनडा चित्रपट महोत्सवात (रिदम्स ऑफ कॅनडा) लाँच करण्यात आला आहे. ती तिच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. पण पोस्टर समोर आल्यानंतर लोकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

नेटकरी काय म्हणत आहेत?

पोस्टरवर अमित शाह, पीएमओला टॅग करणाऱ्या एका सोशल मीडिया यूजरने यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दुसर्‍या युजरने लिहिले - लाज वाटली पाहिजे. माँ कालीला दाखवलेला स्वभाव तुमचा आहे, मां कालीचा नाही. मा काली स्वतः तुम्हाला याची शिक्षा देईल. या दुष्कृत्यासाठी तुम्हाला कधीही माफी मिळणार नाही.

Web Title: Kaali poster: Goddess holding a cigarette in one hand and LGBT flag in the other, Netizens got angry over the movie poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.