'कालिन भैया' फेम पंकज त्रिपाठीच्या लेकीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तिच्या सौंदर्याचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 19:38 IST2025-03-18T19:37:53+5:302025-03-18T19:38:17+5:30
Pankaj Tripathi: अभिनेता पंकज त्रिपाठीने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. आता त्याची मुलगी १८ वर्षांची झाली असून ती आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकत आहे.

'कालिन भैया' फेम पंकज त्रिपाठीच्या लेकीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, तिच्या सौंदर्याचं होतंय कौतुक
बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी(Pankaj Tripathi)ने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले आहे. आता त्याची मुलगी १८ वर्षांची झाली असून ती आपल्या सौंदर्याने लोकांची मने जिंकत आहे. आशी त्रिपाठी असे तिचे नाव आहे. अलिकडेच महाकुंभ आणि बनारस ट्रीपदरम्यान आशी तिच्या आई-वडिलांसोबत दिसली आणि तिच्या सौंदर्याची झलक पाहायला मिळाली. आता आशी त्रिपाठीने अभिनयात पदार्पण केले आहे. ती कोणत्याही चित्रपटात नाही तर म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. इथूनच तिच्या करिअरला सुरुवात झाली आहे.
आशी त्रिपाठी 'रंग दारो' या गाण्यात झळकली आहे. हे गाणे १४ मार्चला होळीच्या मुहूर्तावर अधिकृतपणे रिलीज करण्यात आले. मेनक भट्टाचार्य आणि संजना रामनारायण यांनी गायलेले 'रंग दारो' अभिनव आर कौशिक यांनी संगीतबद्ध केले आहे. सध्या आशी मुंबईतील कॉलेजमध्ये शिकत आहे. तिच्या डेब्यू म्युझिक व्हिडिओमध्ये, ती एका चित्रकाराच्या प्रेरणाच्या रुपात पाहायला मिळत आहे. अलिकडेच, आशीचे वडील पंकज त्रिपाठीने सांगितले की, तिला पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिल्यानंतर भावूक झाले होते.
लेकीच्या पदार्पणाबद्दल बोलताना पंकज त्रिपाठीने सांगितले, 'आशीला पडद्यावर पाहणे हा आम्हा दोघांसाठी भावनिक आणि अभिमानाचा क्षण होता. ती नेहमीच परफॉर्मिंग आर्ट्सची चाहती राहिली आहे आणि तिच्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तिला असे काम करताना पाहणे खरोखरच विशेष होते, जर हे तिचे पहिले पाऊल असेल तर तिचा प्रवास तिला कुठे घेऊन जातो हे पाहण्यासाठी मी उत्साहित आहे.' आशीची आई मृदुला त्रिपाठीने सांगितले की, जेव्हा अभिनवने आशीला व्हिडिओसाठी तिच्याशी संपर्क साधला तेव्हा तिने याबद्दल पंकजशी बोलण्याचा निर्णय घेतला आणि त्याने सपोर्ट केले.
वर्कफ्रंट
दरम्यान, पंकज त्रिपाठीच्या कामाबद्दल सांगायचे तर, शेवटचा तो 'स्त्री २' मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावसोबत दिसला होता. आता तो लवकरच चित्रपट निर्माता अनुराग बासूच्या 'मेट्रो धिज डेज'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, अली फजल आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत.