'या' अभिनेत्याला तुम्ही ओळखले का? मोठ्या ब्रेकनंतर येणार रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 03:14 PM2019-08-29T15:14:29+5:302019-08-29T15:14:34+5:30
ही वेबसिरीज १२ भागांची असून, तिचे दिग्दर्शन एन. पद्मकुमार यांनी केले आहे. यात नवीन कस्तुरिया, श्रावण रेड्डी, मंदिरा बेदी, वासुकी संकवेली आणि सत्यदीप मिश्रा यासारखे कलाकार आहेत.
'खून भरी मांग' या सिनेमामधील खलनायक किंवा 'मैं हूँ ना' मधील जनरल बक्षी म्हणून आपण कबीर बेदी यांना ओळखतो. हा अभिनेता, प्रेझेंटर आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आता सप्टेंबर महिन्यात डिजिटल डेब्यू करणार आहे. `किसका होगा थिंकिस्तान सीझन २’च्या अप्रतिम कलाकारांमध्ये त्यांचाही समावेश आहे. या सिरीजमध्ये ते दानिश नावाचे अत्यंत महत्त्वाचे पात्र साकारणार आहेत. दानिश `एमटीएमसी’ या अॅड एजन्सीचा मालक असणार आहे. यूएस, इटली आणि भारतात विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या मोजक्या कलाकारांपैकी या अभिनेत्याचे नाव घेतले जाते. आता डिजिटल क्षेत्रातही त्यांनी पाऊल टाकलेले आहे, त्यासाठी आम्ही नक्कीच उत्सुक आहोत.
त्यांच्या पदार्पणाविषयी आणि भूमिकेविषयी कबीर म्हणाले, ``सिनेनिर्माता बनण्यासाठी खरेतर मी मुंबईमध्ये आलो होतो. इथे मी पाच वर्षं अॅडव्हर्टायझिंग कंपनीत काम केले. या वेब सिरीजच्या गोष्टीने माझ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. आव्हानांना तोंड देणाऱ्या एका अॅड एजन्सीचा मालक अशी माझी भूमिका असणार आहे. डिजिटल क्षेत्रात पाहुणा कलाकार म्हणून अशी भूमिका मिळणे हा फार छान अनुभव आहे.’’
`थिंकिस्तान’मुळे तुम्हाला अॅडव्हर्टायझिंग जग पाहायला मिळेल. `किसका होगा थिंकिस्तान सीझन २’मध्ये प्रेक्षकांना एजन्सीमधल्या चार भिंतींमधलं भरपूर नाट्य, राजकारण आणि एकमेकांमधलं शत्रुत्व पाहाता येणार आहे. ही वेबसिरीज १२ भागांची असून, तिचे दिग्दर्शन एन. पद्मकुमार यांनी केले आहे. यात नवीन कस्तुरिया, श्रावण रेड्डी, मंदिरा बेदी, वासुकी संकवेली आणि सत्यदीप मिश्रा यासारखे कलाकार आहेत.
या सीझनमध्ये नील भूपलाम यांनी नवीन बॉसच्या भूमिकेत नकारात्मक पात्र साकारले आहे; घाणेरड्या राजकारणामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला वेठीला धरणारा हा बॉस असणार आहे. या सिरीजला भरघोस प्रतिसाद लाभला आणि आता सीझन २ बाबत भरपूर अपेक्षा वाढलेल्या आहेत. या शोला प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभले आहे, यामुळे निर्माते आता किसका होगा थिंकिस्तान सीझन २ तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. आता तुम्हाला डबल अॅक्शन, डबल ड्रामा अनुभवता येणार आहे. शिवाय वैयक्तिक असो की व्यावसायिक – क्षमतांची पडताळणी घेणारे वाइल्डकार्डही या सीझनमधून परत येणार आहे.