'Kacha Badam' फेम भुवन बादायकरचं उजळलं नशीब, आता त्याच्याकडे शेंगदाणे विकण्यासाठीही नाहीये वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 12:31 PM2022-11-03T12:31:18+5:302022-11-03T12:32:01+5:30
Kacha Badam singer Bhuban Badyakar : शेंगदाणे विकणारा भुवन बादायकरचं ‘काचा बादाम’ हे गाणं किती लोकप्रिय झालं, हे नव्यानं सांगायची गरज नाही. गाणं इतकं तुफान व्हायरल झालं की भुवन एका रात्रीत स्टार झाला.
'काचा बादाम' ( Kacha Badam) गाण्यामुळे रातोरात स्टार झालेला भुवन बादायकर (Bhuban Badyakar) तुम्हाला आठवत असेल, ज्याच्यामुळे आज अंजली अरोरा प्रसिद्ध झाली आहे. कारण त्याच्या या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली होती. तोच भुवन बादायकर पुन्हा एकदा आपल्या नव्या अल्बममधून कमबॅक करणार आहे. तो आता नवनवीन आणि वेगळी गाणी बनवून लोकांचे मनोरंजन करण्यात मग्न आहे. मात्र, आता कोणते नवीन गाणे येत आहे, याबाबत त्याने एका मुलाखतीत सांगितले. यावेळी त्याने आता शेंगदाणे विकणार नसल्याचे सांगितले.
भुवन बादायकर शेंगदाणे विकण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. एवढ्या तुटपुंज्या उत्पन्नातून तो कुठच्या कुठे पोहचला. मे महिन्यात कार अपघातानंतर तो बेपत्ता झाला होता. आता तो बरा आहे आणि नवीन अल्बम रिलीज करण्याची तयारी करत आहे. त्याच्या मते या अल्बममध्ये तीन गाणी असतील, जी त्याच्या आयुष्याच्या प्रवासावर आधारित असेल.
'आज तक'च्या रिपोर्टनुसार, भुवन बादायकर म्हणाला की, 'आता मी शेंगदाणे विकणार नाही' हे माझ्या अल्बमचे नाव आहे, त्यात प्रसिद्ध होण्यापूर्वीची माझी कहाणी आहे. आता हे काम करायचे नाही असे नाही पण त्यासाठी वेळ नाही. आता त्याला आयुष्य जगायचे आहे. भुवन म्हणतो त्याच्याकडे आता कार आहे. तो त्याच्या अवतीभवती असतो. हेच आता त्याच्या आयुष्यातील सत्य आहे, जे त्याला गाण्यांमधून दाखवायचे आहे आणि सांगायचे आहे. भुवन पुढे म्हणाला की, तो स्वत:ला भाग्यवान समजतो की लोकांना आता त्याला ऐकायचे आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे गाणे ऐकायचे आहे. एकत्र काम करायचे आहे.
भुवन बादायकर सध्या जात्रा नावाच्या थिएटर ग्रुपशी संबंधित आहे. तो त्यांच्या बरोबर काम करतोय. त्यांनी बंगालमध्ये अनेक ठिकाणी दौरे केले आहेत आणि करत आहेत. दुर्गापूजेच्या वेळी त्यांनी त्यांच्या गाण्यांवर काम पूर्ण केले होते. आता तो फक्त रिलीज होण्याची वाट पाहत आहे.