Kadar Khan : खलनायकी भूमिका नाकारुन कादर खान विनोदी अभिनेता का बनले ? मुलाच्या प्रेमाखातर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 02:01 PM2022-12-31T14:01:05+5:302022-12-31T14:03:10+5:30

कादर खान यांनी परवरिश सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. परवरिश रिलीज झाला आणि सुप्रिमो' हा शब्द खूपच प्रचलित झाला.

kadar-khan-death-anniversary-he-once-revealed-why-he-stopped-playing-villain-characters | Kadar Khan : खलनायकी भूमिका नाकारुन कादर खान विनोदी अभिनेता का बनले ? मुलाच्या प्रेमाखातर...

Kadar Khan : खलनायकी भूमिका नाकारुन कादर खान विनोदी अभिनेता का बनले ? मुलाच्या प्रेमाखातर...

googlenewsNext

Kadar Khan :  १९७७ मध्ये बिग बी अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांचा 'परवरिश' हा चित्रपट तुफान हिट झाला. सिनेमात दोन दिग्गज कलाकार असताना आणखी एका अभिनेते भाव खाऊन गेले ते म्हणजे कादर खान. कादर खान यांनी सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. परवरिश रिलीज झाला आणि सुप्रिमो हा शब्द खूपच प्रचलित झाला. कादर खान यांचे सिनेमातील पात्राचे नाव 'सुप्रिमो' असे होते. त्या काळी सुप्रिमो म्हणजे एक कूल व्हिलन होता जो नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा. त्याच्याकडे लपूनछपून पळण्यासाठी एक वैयक्तिक सबमरिन होती. असं मजेदार पण खलनायकी ते पात्र होतं.

७० ते ८० च्या दशकात खलनायकी पात्र गाजवणारे कादर खान ९० च्या दशकात मात्र विनोदी भूमिकांकडे वळले. 'दुल्हे राजा', 'बोल राधा बोल', 'हिरो नं १' सारख्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या विनोदी भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण हेच कादर खान आधी खलनायक म्हणून ओळखले जायचे. मग असे काय घडले की त्यांनी व्हिलनच्या भूमिका करणं बंदच केलं याचा किस्सा कादर खान यांनी एका मुलाखतीत सांगितला.

कादर खान सांगतात, ' माझा मुलगा अब्दुलमुळे मी खलनायक साकारणे कायमचे सोडले. अब्दुल जेल्हा मित्रांसाबत खेळायला जायचा तेव्हा घरी आला की त्याचे कपडे फाटलेले दिसायचे. एका खलनायकासारखा तो रोज शेवटी मार खायचा. त्याचे मित्र त्याला म्हणाले तुझे बाबा लोकांना मारतात आणि शेवटी स्वत:च मार खातात. '

ते पुढे म्हणाले, 'माझ्या अशा भूमिकांमुळे माझ्या मुलाला सामना करावा लागत होता. तो कमेंट्समुळे चिडायचा आणि भांडून यायचा. एक दिवस तर तो सेटवर आला तेव्हा त्याच्या डोक्याला मार लागला होता. तेव्हा मी निराश झालो आणि ठरवलं आता व्हिलनची भूमिका कधीच करायची नाही. तेव्हा एक विनोदी सिनेमा हिम्मतवाला बनत होता त्यात मी भूमिका करायचे ठरवले. तिथून मी फक्त विनोदी भूमिकाच केल्या.'

कादर खान एक उत्तम अभिनेता आणि लेखकही होते. ३१ डिसेंबर २०१८ रोजी त्यांचे निधन झाले. ते गंभीर आजाराने त्रस्त होते. हजरजबाबी आणि धारदार बोलणाऱ्या कादर खान यांना शेवटचे काही महिने तोंडातून शब्द काढणेही कठीण झाले होते.

Web Title: kadar-khan-death-anniversary-he-once-revealed-why-he-stopped-playing-villain-characters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.