अन् कादर खान यांना कब्रस्तानात मिळाली अभिनयाची संधी, वाचा त्यांचा इंजिनीअर ते अभिनेता होण्याचा प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 01:51 PM2023-10-24T13:51:04+5:302023-10-24T13:54:48+5:30

मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेजमधून पदवी आणि नंतर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले, मग त्यांची अभिनयात एंट्री कशी झाली ते वाचा.

kader khan know about bollywood veteran actor life career unknown facts and his struggle story | अन् कादर खान यांना कब्रस्तानात मिळाली अभिनयाची संधी, वाचा त्यांचा इंजिनीअर ते अभिनेता होण्याचा प्रवास!

अन् कादर खान यांना कब्रस्तानात मिळाली अभिनयाची संधी, वाचा त्यांचा इंजिनीअर ते अभिनेता होण्याचा प्रवास!

अभिनेता, कॉमेडियन, दिग्दर्शक आणि डायलॉग रायटर कादर खान अखेरीस ‘हो गया दिमाग का दही’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. ‘कुली, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, शराबी आणि अमर-अकबर-अ‍ॅँथनी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे डायलॉग लिहणा-या कादर खान यांच्यासाठी बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध करणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. कारण कादर खान यांचे लहानपण खूपच गरिबीत गेले. अशातही त्यांनी कधीच हार मानली नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केले.  

कधी नायक,कधी खलनायक तर कधी विनोदवीर अशा विविध भूमिका साकारुन कादर खान यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कादर खान यांचा मूळ जन्म अफगाणिस्तानमध्ये झाल्याचं सांगण्यात येतं. परंतु, ते लहान असतानाच त्यांच्या कुटुंबियाने अफगाणिस्तान सोडून भारतात आले. येथे मुंबईतील धारावीमध्ये त्यांनी त्याचं  बस्तान मांडलं. परंतु, यावेळी त्यांना मोठा स्ट्रगल करावा लागला. ते लहान असतानाच त्यांचे आई-वडील विभक्त झाले. कादर खान यांनी शिकून मोठं व्हावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले. आईची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी कादर खान यांनीही प्रयत्न केले. मुंबईतील इस्माईल युसूफ कॉलेजमधून पदवी आणि नंतर सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. अभ्यासासोबतच त्यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी ही आवडदेखील जोपासली.

जेव्हा कादर खान यांचे वय ८ ते ९ वर्षे होते. कादर खान यांची आई त्यांना नमाज पठण करण्यासाठी तेथील एका मस्जिदमध्ये पाठवित असे. मात्र कादर यांचे मन दुसरीकडेच असायचे. ते मस्जिदमध्ये न जाता शेजारील कब्रस्तानमध्ये जात असत. त्याठिकाणी तासन्तास ते मनात येईल ते बोलत असत. हा सिलसिला बरेच दिवस चालला. मात्र एक दिवस त्याच कब्रस्तानमध्ये त्यांचे नशीब पालटले. 

 ‘वामक अजरा’! या प्लेमध्ये एका आठ-नऊ वर्षांच्या मुलाची गरज होती. ज्याला यंग प्रिंसची भूमिका साकारायची होती. त्याचबरोबर या मुलाला जवळपास ४० पानांच्या स्क्रिप्टचे स्मरणही करायचे होते. 

अशरफ यांना कादर खान यांच्याविषयी माहिती झाले. त्यांनी बरेच दिवस कब्रस्तानमध्ये जाताना कादर खान यांचा पाठलाग केला. पुढे एक दिवस त्यांनी कादर खान यांना कब्रस्तानमध्ये जाऊन विचारले की, तू एका प्लेमध्ये अभिनय करणार काय? कादर यांनी म्हटले की, मला अभिनयाविषयी फारसे माहिती नाही. तेव्हा अशरफ यांनी कादर यांना दुसºया दिवसापासून आपल्या घरी अभिनय शिकण्यासाठी बोलाविले. बरोबर एक महिन्यानंतर कादर खान यांनी यंग प्रिंसची भूमिका साकारली. त्याकाळी त्यांचा अभिनय एवढा पसंत केला गेला की, लोक उभे राहून टाळ्या वाजवायचे. अशा पद्धतीने कादर खान यांच्या अभिनय करिअरला सुरुवात झाली. 

Web Title: kader khan know about bollywood veteran actor life career unknown facts and his struggle story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.