Kader Khan Death Anniversary: 47 वर्षापूर्वी जेव्हा सिनेमाचे डायलॉग लिहीण्यासाठी मिळाली होती इतकी मोठी रक्कम, वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 10:29 AM2021-12-31T10:29:23+5:302021-12-31T10:29:55+5:30
Kader Khan Death Anniversary: 31 डिसेंबर 2018 रोजी कादर खान यांनी जगाचा निरोप घेतला. आजही त्यांच्या फिल्मी करिअरप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यातले किस्से प्रचंड चर्चेत असतात.
उत्कृष्ट कलाकार, विनोदी कलाकार, चरित्र कलाकार, खलनायक, उत्कृष्ट पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि त्याहीपेक्षा एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे कादर खान. कादर खानसोबत (Kadar Khan) केलेले कलाकार आजही त्यांच्या आठवणीत रमतांना दिसतात. पडद्यावर त्यांनी कोणतीही भूमिका साकारली तरी त्यांनी रसिकांच्या मनावर छाप सोडली. 31 डिसेंबर 2018 रोजी कादर खान यांनी जगाचा निरोप घेतला. आजही त्यांच्या फिल्मी करिअरप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यातले किस्से प्रचंड चर्चेत असतात.
हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक ते कॉमेडियन अशा वेगवेगळ्या भूमिका करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कादर खान यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ रोजी अफगाणिस्तानातील काबुल येथे झाला होता. कादर खान यांची ही लेखणी होती की त्यांच्या संवादांमुळे त्यांनी अनेक चित्रपट हिट केले होते. सुपरस्टार राजेश(Rajesh Khanna) खन्ना असो वा अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), या ज्येष्ठ अभिनेते-लेखकाचे कारकीर्द हिट करण्यात मोठे योगदान आहे. याशी संबंधित एक मनोरंजक किस्साही नेहमीच चर्चेत असतो
मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांचा 1974 मध्ये 'रोटी' चित्रपट प्रदर्शित झाला होता. राजेश खन्ना आणि मुमताज(Mumtaz) यांचा हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाचे संवाद कादर खान यांनी लिहिले होते आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 47 वर्षांपूर्वी मनमोहन देसाई यांनी त्यांना या चित्रपटाचे संवाद लिहिण्यासाठी 1 लाख 25 हजार इतके मानधन दिले होते.
एका मुलाखतीत कादर खान यांनी सांगितले होते की, जेव्हा ते मनमोहन देसाईंना भेटले तेव्हा ते म्हणाले होते की, 'मला माहित आहे की तुम्ही लोकांना समोर ठेवून संवाद लिहीतात कविता लिहिता.पण मला कविता नकोत, टाळ्या वाजवणारे संवाद हवे आहेत. लिहून दमदार संवाद नसले तर सगळी स्क्रिप्ट कचर्यात
टाकीन.