कियारा आडवाणी म्हणते, वेबफिल्म नको गं बाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 09:34 AM2018-09-29T09:34:52+5:302018-09-29T09:36:21+5:30
'एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या सिनेमातून अभिनेत्री कियारा आडवाणीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. कियारा काही महिन्यांपूर्वी लस्ट स्टोरिज वेबफिल्ममध्ये दिसली होती.
'एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या सिनेमातून अभिनेत्री कियारा आडवाणीने प्रेक्षकांच्या मनात घर केले. कियारा काही महिन्यांपूर्वी लस्ट स्टोरिज वेबफिल्ममध्ये दिसली होती. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'लस्ट स्टोरिज' हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील कियाराच्या भूमिकेचीही प्रचंड चर्चा झाली. यात कियाराने अश्लिल दृश्य दिले होते. त्या दृश्याने खळबळ उडवून दिली होती.
'लस्ट स्टोरीज'मधील कियारा अडवाणीच्या त्या दृश्याने खळबळ उडवून दिली होती. या दृश्यावेळी 'कभी खुशी कभी गम' हे गाणे वापरण्यात आल्याने मंगेशकर कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याचीही बातमी आली होती. या दृश्यामुळे कियाराची बरीच चर्चा झाली होती. या डिजिटल प्लॅटफॉर्मने कियाराच्या करिअरला गती दिली. पण कियाराचे खरे मानाल तर या वेबफिल्ममध्ये काम करण्याची कियाराला अजिबात इच्छा नव्हती.
करण जोहर या वेबफिल्मचा निर्माता आहे, केवळ आणि केवळ या एकाच कारणाने तिने ही वेबफिल्म स्वीकारली होती. पण यामुळे वेबफिल्म वा वेबसीरिजमध्ये काम करणार नाही, हे कियाराने ठरवून टाकले आहे. मला कधीच डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करायचे नव्हते. मला चांगल्या बॉलिवूड प्रोजेक्टची प्रतीक्षा होती. केवळ करणमुळे मी 'लस्ट स्टोरिज' केला. पण आता यानंतर मी कुठलीही वेबसीरिज वा वेबफिल्म करणार नाही, असे कियारा म्हणाली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणतेच निर्बंध लागू होत नसल्याने त्यात तारतम्य बाळगले जात नाही. अर्थात त्यामुळे अभिनयाचे निकषच पाळले जात नाहीत, असे तिला वाटते.
लवकरच कियारा 'गुड न्यूज'मध्ये करिना कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. याशिवाय 'कलंक' या चित्रपटात कियारा छोटी भूमिका करताना दिसणार आहे.