‘कगार’मध्ये झळकलेले अभिनेते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:05 PM2022-02-02T13:05:10+5:302022-02-02T13:05:57+5:30

Amitabh Dayal Passed Away : मृत्यूच्या चार दिवसांआधी शेअर केला होता व्हिडीओ; त्यामध्ये त्यांनी कधीही हार मानू नका, असा संदेश दिला होता.

Kagaar: Life on the Edge actor Amitabh Dayal dies of heart attack at 51 | ‘कगार’मध्ये झळकलेले अभिनेते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

‘कगार’मध्ये झळकलेले अभिनेते अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  

googlenewsNext

Amitabh Dayal Passed Away : अमिताभ बच्चन, संजय दत्त, ओमपुरी अशा दिग्गजांसोबत झळकलेले अभिनेते अमिताभ दयाल (Amitabh Dayal ) यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गत 17 जानेवारीला त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळले होते. गत शनिवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. तथापि उपचारादरम्यान बुधवारी पहाटे 4.30 वाजता त्यांना हृदयविकाराचा दुसरा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.अमिताभ दयाल यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येणार आहेत. त्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

मृत्यूआधी दयाल यांनी आपल्या इंस्टाग्रामवर हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी कधीही हार मानू नका, असा संदेश दिला होता. कधीही हार मानू नका..देव तुम्हाला चांगले काहीतरी देण्याची वाट पाहत आहे. लढत रहा.., असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.   
अमिताभ दयाल यांनी 2000 साली मराठी दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर 9 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला होता. दोघांना शिवम व अमृता पाटील अशी दोन मुलं आहेत.

अमिताभ दयाल यांनी अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम, संजय दत्त स्टारर ‘विरुद्ध’ या सिनेमात काम केलं होतं. 2012 साली त्यांचा रंगदारी हा सिनेमा रिलीज झाला होता. 2013 साली राज बब्बर यांच्या ‘धुन’ या सिनेमातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली हेती. ओम पुरी व नंदिता दास यांच्या ‘कागर- लाईफ आॅन द एज’ या सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली होती. 2005 मध्ये ‘दिल्लगी... ये दिल्लगी’ या चित्रपटातही त्यांची भूमिका होती.

Web Title: Kagaar: Life on the Edge actor Amitabh Dayal dies of heart attack at 51

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.