कंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 08:01 PM2018-12-10T20:01:11+5:302018-12-10T20:03:27+5:30

अभिनेत्री कंगना रानौत सध्या कबड्डीचे प्रशिक्षण घेते आहे.

Kagna Ranaut is taking Lessons of 'Kabaddi ' for upcoming movie | कंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे

कंगना रानौत 'ह्या' सिनेमासाठी गिरवतेय कबड्डीचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्देकंगना खेळणार कबड्डी पंगा चित्रपटातकंगना पहिल्यांदाच खेळणार कबड्डी

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रानौत सध्या आगामी चित्रपट 'पंगा'साठी कबड्डीचे प्रशिक्षण घेते आहे. 'पंगा' हा चित्रपट कबड्डी खेळावर आधारीत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेड्युल भोपाळमध्ये ६ डिसेंबरला पूर्ण झाले आहे. पण, चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दुसऱ्या शेड्युलच्या चित्रीकरणासाठी दीड महिन्याचा ब्रेक घेण्यात आला आहे. कारण या सिनेमातील कलाकार कबड्डी शिकू शिकतील.
खरेतर पंगा चित्रपटात कबड्डीचे खूप सीन आहेत. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना कंगना व चित्रपटातील इतर कलाकार स्क्रीनवर कबड्डी खेळताना नॅचरल वाटेल. त्यामुळे जवळपास दीड महिन्यांपर्यंत या कलाकारांना कबड्डीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कलाकारांना राष्ट्रीय पातळीवरील गौरी वाडेकर, विश्वास मोरे व तारक रोल प्रशिक्षण देणार आहे. 
'पंगा' चित्रपटाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी म्हणाली की, या चित्रपटात कंगना रानौतची बॉडी डबल वापरायची नव्हती. त्यामुळे कंगनाला ट्रेनिंग घ्यायला सांगितले. तर कंगना रानौतदेखील कबड्डी खेळ खूप एन्जॉय करते आहे. यापूर्वी ती कधीच कबड्डी खेळलेली नाही आणि तिच्यासाठी हा खेळ नवादेखील नाही. त्यामुळे तिला या खेळातील बारकावे समजायला कोणताच त्रास होत नाही.
'पंगा'मध्ये कंगना राणौत एका कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे़. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. आता त्यापूर्वी ‘पंगा’च्या सेटवर काय काय घडामोडी घडतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: Kagna Ranaut is taking Lessons of 'Kabaddi ' for upcoming movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.