अभिनेत्री काजल अग्रवालसाठी पती गौतम बनला फोटोग्राफर, क्लिक केले एक से बढकर एक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 06:29 PM2020-11-10T18:29:25+5:302020-11-10T18:34:20+5:30
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू सध्या मालदीवमध्ये हनीमून एन्जॉय करत आहेत.
अभिनेत्री काजल आणि गौतमने 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत पंजाबी आणि काश्मिरी पद्धतीने लग्न केले. लग्नाची प्रत्येक अपडेट ती सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत होती. लग्नाच्या दिवसापासूनच लग्नाचे फोटो आणि इतर विधींचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.
काजल अग्रवाल सध्या मालदीव्हज मध्ये तिचे हनीमून एन्जॉय करतेय. मालदीव्हजमध्ये काजल अग्रवाल तिच्या पतीसह क्लॉलीटी टाईम घालवतेय. तेथील एक से बढकर एक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
अलीकडेच तिने आपला लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा करतानाचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर ती हनीमूनसाठी रवाना झाली होती. त्यावेळी ती हनीमूनसाठी कुठे जात आहे या विषयी तिने काहीच सांगतिले नव्हते.
मात्र फोटो समोर आल्यानंतर ती मालदीव्हज मध्ये असल्याचे चाहत्यांना समजले. विशेष म्हणजे पती गौतमही तिच्यासाठी फोटोग्राफर बनलाय. तिचे एक से बढकर एक फोटो क्लिक करण्याचे काम तो करतोय.
नुकतेच काजलने लाल रंगाच्या बॅकलेस ड्रेसमधले फोटो शेअर केले होते. या फोटोंनाही अधिक पसंती मिळाली होती. एका फोटोमध्ये ती गौतमसोबत रोमँटिक पोज देतानाही दिसत आहे.या फोटोमध्ये काजलचा ग्लॅमरस अवतार बघायला मिळतोय.
‘सिंघम गर्ल’ची बहिण आहे तिच्यापेक्षाही सुंदर; म्हणून सोडले करिअर
काजल साऊथची अभिनेत्री. पण बॉलिवूडमध्येही तिची वेगळी ओळख आहे. पण आज आम्ही काजलबद्दल नाही तर तिच्या बहिणीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. होय, काजलची ही बहीण तिच्याइतकीच सुंदर आहे. ही काजलची लहान बहीण. तिचे नाव निशा अग्रवाल. अनेकांना माहित नसेल पण निशा ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. काजलपेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या निशाने 2010 मध्ये तेलगू सिनेमा ‘’मधून अॅक्टिंग डेब्यू केला होता. यानंतर अनेक तामिळ, तेलगू व मल्याळम सिनेमांत काम केले. निशाने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. त्यामुळे साऊथच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. सध्या निशा चित्रपटांपासून दूर आहे. याचे कारण म्हणजे, लग्नानंतर चित्रपट न करण्याचा तिने घेतलेला निर्णय.