Kajal Aggarwalच्या बहिणीनं दाखवली छोट्या नवाबची झलक, अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 14:42 IST2022-06-02T14:40:59+5:302022-06-02T14:42:52+5:30
Kajal Aggarwal: साउथची अभिनेत्री काजल अग्रवालच्या मुलाची झलक तिच्या बहीणीने नुकतीच झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Kajal Aggarwalच्या बहिणीनं दाखवली छोट्या नवाबची झलक, अभिनेत्रीनं दिली अशी रिअॅक्शन
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) काही दिवसांपूर्वीच आई झाली आहे. अभिनेत्रीने मदर्स डेच्या दिवशी तिच्या मुलाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली. मात्र, या फोटोत त्याचा चेहरा दिसला नाही. असे असूनही सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोनंतरही अभिनेत्री काजल अग्रवालच्या चाहत्यांना मुलाची झलक दिसली नाही. दरम्यान, अभिनेत्री काजल अग्रवालची बहीण निशा अग्रवाल हिने तिच्या मुलाची आणखी एक सुंदर झलक चाहत्यांना दाखवली आहे. निशा अग्रवालने हा फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये निशा अग्रवालने बाळ नीलला आपल्या मांडीवर घेतलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्री निशा अग्रवालने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सुकुन.. काजल अग्रवाल, मला माझ्या आनंदाचे क्षण लवकर दे.' या फोटोवर प्रतिक्रिया देताना स्वत: अभिनेत्री काजल अग्रवालने हार्ट इमोजी शेअर केला आहे.
अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच उमा या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या चित्रपटांपासून दूर आहे. गरोदरपणामुळे अभिनेत्रीला नागार्जुन स्टारर चित्रपट 'द घोस्ट'मधून सुट्टी देण्यात आली आहे. याशिवाय तिच्या हातात आणखी काही चित्रपट होते, त्या चित्रपटात आता दुसऱ्या अभिनेत्रींनी जागा घेतली आहे.
अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सध्या ती सोशल मीडियापासूनही दूर आहे. ती तिच्या कुटुंबाला आणि बाळा नीलला अधिकाधिक वेळ देत आहे. काजल अग्रवालने या वर्षी एप्रिलमध्ये मुलाला जन्म दिला.