फुलांनी सजलेल्या बेडवर काजल अग्रवालच्या खास अदा, फोटो व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 16:07 IST2018-10-20T16:06:44+5:302018-10-20T16:07:03+5:30
टॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल ही नेहमीच आपल्या चार्मसाठी चर्चेत असते. ती टॉलिवूडची सध्याची सर्वात क्यूट अभिनेत्री मानली जाते.

फुलांनी सजलेल्या बेडवर काजल अग्रवालच्या खास अदा, फोटो व्हायरल!
टॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री काजल अग्रवाल ही नेहमीच आपल्या चार्मसाठी चर्चेत असते. ती टॉलिवूडची सध्याची सर्वात क्यूट अभिनेत्री मानली जाते. सोशल मीडियात तिचे सतत व्हायरल होणारे फोटो पाहून तिच्या चाहत्यांचा अंदाज लावला जाऊ शकतो. काजलचे असेच काही नवीन आणि खास फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
काजल अग्रवालने नुकतंच एक फोटोशूट केलं असून ती यात फुलांनी सजलेल्या बेडवर दिसत आहे. वेगवेगळ्या एक्सप्रेशनमध्ये तिने यात फोटो काढले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. यातील काही फोटो व्हायरलही झाले आहेत. या फोटोंमध्ये तिने नेहमीप्रमाणे आपल्या चार्मने चाहत्यांना घायाळ केलं आहे.