अमिषापूर्वी ऐश्वर्या अन् माधुरीला ऑफर झाला होता 'गदर'; 'या' क्षुल्लक कारणामुळे नाकाराला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:11 AM2023-08-18T11:11:33+5:302023-08-18T11:12:21+5:30
Gadar: 22 वर्षांपूर्वी 'गदर: एक प्रेमकथा' हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपट त्याकाळीही बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता.
सध्या बॉक्स ऑफिसवर सनी देओलचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यापासून तो यशस्वी घोडदौड करत आहे. त्यामुळे या सिनेमाची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा रंगत आहेत. या सिनेमामध्ये सनीसोबत अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत झळकली आहे. 'गदर 2' प्रमाणेच 'गदर'मध्येही ती झळकली होती. परंतु, या सिनेमासाठी अमिषाला पहिली पसंती नव्हती. तिच्याऐवजी बॉलिवूडमधील टॉपच्या तीन अभिनेत्रींना ही भूमिका ऑफर झाली होती. मात्र, त्यांनी काही किरकोळ कारणामुळे ही भूमिका नाकारली. नुकत्याच या अभिनेत्री कोण, आणि त्यांनी हा सिनेमा का नाकारला या मागचं कारण समोर आलं आहे.
22 वर्षांपूर्वी 'गदर: एक प्रेमकथा' हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपट त्याकाळीही बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर रांग लावली होती. या सिनेमाची कथा, कलाकारांचा अभिनय सारंच प्रेक्षकांना भावलं होतं. त्यामुळे या सिनेमाचा सिक्वेलदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु, 'गदर'साठी अमिषा पटेल हिला पहिली पसंती नव्हती. अमिषापूर्वी ऐश्वर्या राय, माधुरी दिक्षित आणि काजोल या अभिनेत्रींचा विचार करण्यात आला होता. मात्र, काही क्षुल्लक कारणांमुळे त्यांनी हा सिनेमा धुडकावला. याविषयी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी नुकतंच भाष्य केलं आहे.
अभिनेत्रींनी का नाकारला गदर?
अलिकडेच 'गदर 2' चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये 'गदर' या सिनेमाच्या स्टारकास्टची निवड कशी झाली होती हे सांगितलं. यावेळी बोलत असताना त्यांनी कोणाचंही नाव न घेता बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींनी हा सिनेमा नाकारल्याचं सांगितलं. अमिषापूर्वी या सिनेमासाठी काजोलला विचारणा करण्यात आली होती का? असा प्रश्न अनिल शर्मा यांना विचारण्यात आला.त्यावेळी उत्तर देताना त्यांनी या हा सिनेमा अनेक अभिनेत्रींनी नाकारल्याचं सांगितलं. ‘‘मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही, हे योग्य नाहीये. त्या काळातील अनेक टॉप अभिनेत्रींसोबत आम्ही संपर्क केला होता. पण, एका अभिनेत्रीला असं वाटलं की सनी देओल तिच्या लायकीचा नाही. तो त्यांच्याप्रमाणे स्टॅडर्ड आयुष्य जगत नाही. त्यामुळे तिने या सिनेमासाठी नकार दिला. तर, काही अभिनेत्रींनी सिनेमाची कथा ऐकण्यापूर्वीच नकार दिला. त्यांना वाटलं की ही एक पीरियड फिल्म आहे. त्यामुळे त्यात काम करणं योग्य नाही, असं अनिल शर्मा म्हणाले.
या अभिनेत्रींनी दिला नकार
सूत्रांच्या माहितीनुसार,काजोलशिवाय (kajol) ऐश्वर्या राय (aishwarya rai) आणि माधुरी दीक्षित यांनाही या सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. परंतु, या सगळ्या अभिनेत्रींनी हा सिनेमा करण्यास नकार दिला. त्यांच्या नकारानंतर अमिषा पटेल हिला पाकिस्तानची सकीना ही भूमिका ऑफर करण्यात आली. विशेष म्हणजे तिनेही या सिनेमासाठी होकार दिला.