शाहरुख खान- काजोलची पुन्हा एकदा जमणार जोडी! ‘या’ सीक्वलसाठी येणार एकत्र!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 02:27 PM2018-12-17T14:27:38+5:302018-12-17T14:31:02+5:30
शाहरुख खान व काजोल या जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. म्हणूनचं ही जोडी जेव्हाकेव्हा पडद्यावर येते, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास चाहते कायम उत्सूक असतात.आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
शाहरुख खान व काजोल या जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. म्हणूनचं ही जोडी जेव्हाकेव्हा पडद्यावर येते, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास चाहते कायम उत्सूक असतात.आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, इरफान खानच्या ‘हिंदी मीडियम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सीक्वलमध्ये शाहरुख व काजोल दिसू शकतात. होय, बॉम्बे टाईम्सने दिलेले वृत्त खरे मानाल तर, या चित्रपटाच्या सीक्वलवर काम सुरु झाले आहे आणि चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, निर्माता दिनेश विजन याने या सीक्वलसाठी शाहरुख व काजोलशी संपर्क केला आहे.
या सीक्वलमध्ये इरफान खान हाही एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. सीक्वलची कथा अमेरिका बेस्ड असेल. ‘हिंदी मीडियम’ हा चित्रपट साकेत चौधरीने दिग्दर्शित केला होता. पण ‘हिंदी मीडियम’चा सीक्वल मात्र होमी अदजानिया दिग्दर्शित करणार आहे. होमीने यापूर्वी दिनेश विजनसोबत कॉकटेल, फार्इंन्डिंग फनी सारखे चित्रपट केले आहे.
एकंदर काय तर शाहरुख व काजोल शिवाय शाहरुख व इरफान अशी दमदार जोडी जमणार असेल तर चाहत्यांसाठी ही डबल ट्रिट म्हणायला हवी.
शाहरुख व इरफानने यापूर्वी २००८ मध्ये आलेल्या ‘बिल्लू’ या चित्रपटात काम केले आहे. इरफान सध्या लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतोय. पण लवकरच इरफान भारतात परतून कामास सुरुवात करेल, असे संकेत आहे. आहे ना, आनंदाची बातमी.
‘हिंदी मीडियम’ हा देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट होता. यातील इरफानच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर यात लीड भूमिकेत होती़. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती.
इरफानच्या कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच म्हणजेच, फेबु्रवारी २०१८ मध्येचं ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलची घोषणा झाली होती. होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार असेही जाहिर करण्यात आले होते. पण इरफानच्या प्रकृतीमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला होता.