​हिंदीत ‘या’ नावाने रिलीज होणार, काजोल -धनुषचा चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2017 08:51 AM2017-06-25T08:51:34+5:302017-06-25T14:21:34+5:30

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि साऊथ सुपरस्टार धनुष यांच्या ‘व्हीआयपी2’ या आगामी सिनेमाबद्दल एक धमाकेदार बातमी आहे. होय, या चित्रपटाच्या ...

Kajol-Boon movie will be released in Hindi | ​हिंदीत ‘या’ नावाने रिलीज होणार, काजोल -धनुषचा चित्रपट!

​हिंदीत ‘या’ नावाने रिलीज होणार, काजोल -धनुषचा चित्रपट!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री काजोल आणि साऊथ सुपरस्टार धनुष यांच्या ‘व्हीआयपी2’ या आगामी सिनेमाबद्दल एक धमाकेदार बातमी आहे. होय, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेत, चित्रपटाचे नाव बाद केले आहे. थांबा... थांबा... इतके धक्कादायक काहीही नाही. ‘व्हीआयपी2’च्या केवळ हिंदी व्हर्जनचे नाव बदलणार आहे. ‘व्हीआयपी2’च्या हिंदी व्हर्जनचे टायटल बदलून ‘ललकार’ ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर भारतातील लोकांना अपील व्हावे, असे शीर्षक निर्मात्यांना हवे होते. त्यानुसार, या नावाची निवड करण्यात आले. त्यामुळे हिंदीत हा चित्रपट ‘ललकार’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. आता ‘ललकार’ किती यशस्वी ठरतो, ते बघुयात.
मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत दिग्दर्शित या चित्रपटातून प्रथमच काजोल व धनुष या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ‘व्हीआयपी2’ हा सन २०१४ मध्ये आलेल्या ‘व्हेलायिला पट्टधारी’ या चित्रपटाचा सीक्वल आहे.  दक्षिणेचा सुपरस्टार धनुष याची मुख्य भूमिका असलेल्या ‘व्हीआयपी २’ या चित्रपटात काजोल सिंगल मदरची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका ‘ग्रे शेड’  आहे.  
याअगोदर निमार्ता दिग्दर्शक राजीव राय यांच्या १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गुप्त’ या चित्रपटात खुनी खलनायिकेची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तशाच रूपात काजोल चित्रपटात दिसणार असल्याचे कळतेय. ‘दिलवाले’नंतर काजोलचा हा कमबॅक चित्रपट आहे.  २०१५ मध्ये आलेल्या ‘दिलवाले’मध्ये काजोल शाहरूख खानसोबत दिाली होती. धनुषबद्दल बोलायचे तर यापूर्वी तो ‘रांझणा’ आणि ‘शमिताभ’ या बॉलिवूडपटांत दिसला होता. आता 

                             

Web Title: Kajol-Boon movie will be released in Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.