काजोलने मुंबईत खरेदी केली ऑफिससाठी नवी जागा; किंमत आहे कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:37 PM2023-08-29T12:37:44+5:302023-08-29T12:43:38+5:30

काजोलने ओशिवराच्या 'सिग्नेचर' इमारतीमध्ये ७.६४ कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

Kajol buys an office space worth Rs 7.64 crore in Mumbai | काजोलने मुंबईत खरेदी केली ऑफिससाठी नवी जागा; किंमत आहे कोटींच्या घरात

Kajol

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अजय देवगणकाजोल यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. आता त्यात आणखी भर पडली आहे.  काजोलने मुंबईत नवीन ऑफिससाठी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे. 

काजोलने ओशिवराच्या 'सिग्नेचर' इमारतीमध्ये ७.६४ कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.  ही इमारत 'Lotus Grandeur' च्या अगदी शेजारी उभी आहे. काजोलच्या ऑफिसच्या जागेजवळ काही नामांकित कंपन्या आहेत.  ज्यामध्ये साजिद नाडियादवाला यांच्या रिलायन्स एंटरटेनमेंट, अंबुदतिया एंटरटेनमेंट आणि बनजय एशियासह सर्व टॉप प्रॉडक्शन कंपन्या आहेत. काजोलने मात्र याविषयी कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. 

विशेष म्हणजे पती अजय देवगण यानेही याच इमारतीत जुलै महिन्यात ४५ कोटी रुपयांना पाच फ्लॅट खरेदी केले होते. याआधी  काजोलने जुहू भागात आणखी दोन अलिशान अपार्टमेंट खरेदी केले होते. काजोल ‘शिवशक्ती’ या बंगल्यात राहते. या बंगल्याच्याच जवळच्या अनन्या बिल्डींगमध्ये काजोलने दोन अपार्टमेंट खरेदी केले होते. २००० स्क्वेअर फुटांचे हे नवे फ्लॅट अनन्या बिल्डींगच्या १० व्या फ्लोरवर आहेत. या दोन्हींची किंमत ११.९५ कोटी आहे. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर काजोलची स्वाक्षरी आहे.  ‘स्क्वेअर फीट इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, जानेवारी महिन्यांत या फ्लॅटची खरेदी प्रक्रिया पार पडली होती. 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर काजोल  'लस्ट स्टोरीज २'मध्ये दिसली होती. तसेच काजोलची ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’ ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपल्बध आहे. याशिवाय काजोल आता ती 'सरजमीन' आणि 'दो पत्ती' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
 

Web Title: Kajol buys an office space worth Rs 7.64 crore in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.