काजोलने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, तब्बल १.७२ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:25 IST2025-03-12T11:25:05+5:302025-03-12T11:25:26+5:30
मुंबईतील गोरेगाव भागात ही प्रॉपर्टी आहे.

काजोलने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, तब्बल १.७२ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी
Kajol Buys Commercial Property: केवळ सामान्य लोकच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्स (Bollywood Actors) प्रॉपर्टी (Property) मध्ये गुंतवणूक करतात. मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जमीन खरेदी करणाऱ्यांची बॉलिवूडकरांची यादी मोठी आहे. या यादीत अभिनेत्री काजोल (Kajol ) हिच नाव आवर्जून येतं. काजोल हिला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला आवडतं. आता नुकतंच तिनं हाय-प्रोफाइल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.
काजोलने मुंबईतीलगोरेगाव पश्चिम येथे भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ४३६५ चौरस फूट क्षेत्रात पसरलेली मालमत्ता खरेदी केली आहे. मालमत्ता खरेदीचा हा करार ६ मार्च २०२५ रोजी झाला. काजोलने १.७२ कोटी रुपयांची मुद्रांक शुल्कही भरले आहे. या रिटेल जागेसाठी काजोलने २८.७८ कोटी रुपये मोजले आहेत. यात पाच कार पार्किंगची जागा देखील आहे.
याआधी काजोलने २०२३ मध्ये ओशिवरा येथील सिग्नेचर बिल्डिंगमध्ये ७.६४ कोटी रुपयांना ऑफिससाठी जागा खरेदी केली होती. ओशिवरा येथील वीरा देसाई रोड येथे बहुतांश सिनेकलाकारांची कार्यालये आहेत. त्याच परिसरात काजोलने हे कार्यालय खरेदी केले होते. काजोलप्रमाणेच तिचा नवरा आणि अभिनेता अजय देवगण यानेदेखील २०२३ मध्ये मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. अजय देवगण याने पाच कार्यालयांची खरेदी केली होती. यापैकी तीन कार्यालयांची किंमत आता ३० कोटी ३५ लाख रुपये इतकी तर उर्वरित दोन कार्यालयांची किंमत १४ कोटी ७४ लाख रुपये होती.