OMG - अर्ध्या रात्री अजय आणि काजोल लेक न्यासाला घेऊन पोहोचले हॉस्पिटलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 13:53 IST2020-03-30T13:39:46+5:302020-03-30T13:53:10+5:30
त्यामुळे काजोल तिला घेऊन हॉस्पिटलला गेली.

OMG - अर्ध्या रात्री अजय आणि काजोल लेक न्यासाला घेऊन पोहोचले हॉस्पिटलमध्ये
कोरोना सारख्या महामारीमुळे सध्या सर्व कलाकारांनी स्वत:ला क्वारांटाईन करुन घेतले आहे. याच दरम्यान अजय देवगण आणि पत्नी काजोल मुलगी न्यासाला घेऊन अर्ध्यारात्री अचानक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. यानंतर फॅन्स अनेक तर्कवितर्क लावत आहेत. राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार खोकला, सर्दी झाली म्हणून काजोल मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली.. डॉक्टरांनी तिला नॉर्मल ताप आल्याचं सांगितले आहे. अजय आणि काजोलच्या मुलगी न्यासा नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अजय देवगण तिला बचाव करण्यासाठी पुढे येत असतो. 18 मार्चला काजोल व तिची मुलगी न्यासा एअरपोर्टवर दिसल होती. या मायलेकींचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे माथे ठणकले. कारण काय तर, काजोल व न्यासाच्या तोंडावर ना मास्क होता, ना हातात ग्लव्ज. कोरानाची इतकी दहशत असताना या मायलेकींना कुठलीही काळजी न घेता विमानतळावर वावरताना पाहून लोकांनी दोघींचाही चांगलाच क्लास घेतला होता. त्यांचा हा निष्काळजीपणा पाहून लोकांनी दोघींनीही जाम फैलावर घेतले होते.
काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, ‘देवी’ या शॉर्ट फिल्ममध्ये ती दिसली. ‘देवी’ या शॉर्ट फिल्ममध्ये काजोल, श्रुती हासन, नेहा धुपिया, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, शिवानी रघुवंशी, संध्या म्हात्रे, रमा जोशी आणि यशस्विनी दयामा या नऊ अभिनेत्री आहेत. त्यात नऊ पीडित महिला आणि त्यांच्या कथा आहेत.