Video : आई काजोलच्या गाण्यांवर न्यासाचा धम्माल डान्स, पाहून तुम्हीही म्हणाल wow
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 03:25 PM2021-04-12T15:25:58+5:302021-04-12T15:26:35+5:30
Watch Video : काजोल व अजय देवगणची लाडकी लेक न्यासा देवगण भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण चर्चेत राहणे तिलाही जमते.
काजोल (Kajol) व अजय देवगणची लाडकी लेक न्यासा देवगण (Nysa Devgn) भलेही चित्रपटांपासून दूर आहे. पण चर्चेत राहणे तिलाही जमते. सध्या न्यासा जाम चर्चेत आहे. कारण काय तर तिचा एक व्हिडीओ. होय, या व्हिडीओत न्यासा आईच्या गाण्यांवर जबदस्त डान्स करताना दिसतेय. ( kajol daughter nysa devgn dances on her hit songs)
न्यासा सध्या सिंगापूरच्या स्कूलमध्ये शिकतेय. शाळेच्या एका इव्हेंटमध्ये न्यासा काजोलच्या ‘कभी खुशी कभी गम’ या सुपरहिट सिनेमातील ‘बोले चूडियां’ या गाण्यावर थिरकताना दिसली.
याशिवाय ‘माय नेम इज खान’मधील ‘सजदा’ आणि ‘तेरे नैना’ या गाण्यांवरही ती थिरकली. करिना कपूरच्या ‘जब वी मेट’ या सिनेमातील ‘नगाडा बजा’ या गाण्यावरही तिने डान्स केला.
न्यासाचा हा डान्य व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
गतवर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर न्यासा मुंबईत परतली होती. यानंतर काही महिन्यांनी ती पुन्हा सिंगापूरला रवाना झाली आहे.
काजोल व अजयची मुलगी असल्याने न्यासा सतत चर्चेत असते. मध्यंतरी न्यासा बॉलिवूडमध्ये करिअर करणार, अशीही चर्चा होती. पण न्यासाचा तसा काहीही इरादा नाही. न्यासाला चित्रपटात अभिनय करण्याची मुळीच इच्छा नाही, असे खुद्द काजोलने यानंतर स्पष्ट केले होते.
न्यासाने इन्स्टाग्रामवर तिचे पेज प्रायव्हेट केले आहे. पण तिच्या नावाचे अनेक फॅन पेजेस आहेत. या फॅन पेजवरचे न्यासाचे फोटो सतत व्हायरल होत असतात. सध्या तिचा हा डान्स व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. अशात हा व्हिडीओ तुम्हीही एकदा बघायला हवाच.