Nysa Devgn Video: अरे देवा! भर कार्यक्रमात हिंदी बोलताना अडखळली न्यासा देवगण, पुन्हा झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 02:27 PM2023-02-21T14:27:14+5:302023-02-21T14:28:31+5:30
Nysa Devgn Video: अजय व काजोलची लेक न्यासा जिथे जाईल तिथे कॅमेरे तिच्यावर रोखलेले दिसतात. अनेकदा ती ट्रोलही होते. सध्याचं प्रकरणही असंच आहे. न्यासा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
Nysa Devgn Video: अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण अनेकदा हेडलाईन्समध्ये असते. कधी पार्ट्यांमुळे, कधी बोल्ड ड्रेसमुळे, कधी लुकमुळे. अजय व काजोलची लेक या नात्यानं न्यासा जिथे जाईल तिथे कॅमेरे तिच्यावर रोखलेले दिसतात. अनेकदा ती ट्रोलही होते. सध्याचं प्रकरणही असंच आहे. न्यासा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
न्यासाने अलीकडे अहमदनगर येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथील एका गावातील डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन तिच्या हस्ते पार पडलं. पिवळ्या रंगाच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये न्यासा या इव्हेंटमध्ये पोहोचली. शाळेतील मुलांसोबत तिने संवाद साधला. त्यांच्यासोबत फोटो क्लिक केलेत. सोबत मुलांना पुस्तकं आणि स्पोर्ट किट्सचही वाटप केलं.
#NysaDevgn took the initiative to open digital libraries, distribute books and sports kits to the students.👏
— sσнαη⚡ (@TheSohan1) February 20, 2023
Ajay sir aaj bahut proud feel kiye honge🙂🙌#NyFoundation#AjayDevgnpic.twitter.com/IDuFOaUr0f
कार्यक्रमात न्यासाने छोटं भाषणही दिलं. आपल्या भाषणात तिने अभ्यास आणि वाचनाचं महत्त्व सांगितलं. पण यादरम्यान न्यासा अडखळताना दिसली. हिंदीत बोलताना तिला शब्दच सुचेनात. हिंदी बोलताना अडखळल्याचा न्यासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. मग काय लोकांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं.
The little speech of nysa devgan about importance of Education pic.twitter.com/MBvX06EZh3
— kamal shekhar (@kamalshekhar3) February 20, 2023
अरे हिचं हिंदी ऐकून हिंदी भाषाही रडत असेल, असं एका युजरने लिहिलं. अरे देवा, हिला फक्त पार्ट्या करायला सांगा, अशी कमेंट एका युजरने केली.
20 एप्रिल 2003 रोजी जन्मलेली काजोल व अजयची लेक न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिकतेय. न्यासाचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र सध्या न्यासा शिकतेय. आत्ता ती तिचं लाईफ एन्जॉय करतेय. ती इतक्या लवकर इंडस्ट्रीत येईल, असं मला वाटत नाही, असं काजोल अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती.