काजोलचा दोन वेळेला झालेला गर्भपात, बाळ गमावल्यानंतर अभिनेत्रीची झालेली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 11:54 AM2023-08-05T11:54:06+5:302023-08-05T11:55:12+5:30

'कभी खुशी कभी गम'च्या सेटवर काजोलचा झालेला गर्भपात, खुलासा करत म्हणालेली, “बाळ गमावल्यानंतर...”

kajol devgn birthday special actress had two miscarriage after marriage with ajay devgn once happened in kabhi kushi kabhi gum shooting | काजोलचा दोन वेळेला झालेला गर्भपात, बाळ गमावल्यानंतर अभिनेत्रीची झालेली अशी अवस्था

काजोलचा दोन वेळेला झालेला गर्भपात, बाळ गमावल्यानंतर अभिनेत्रीची झालेली अशी अवस्था

googlenewsNext

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल देवगणचा ४९वा वाढदिवस आहे. ऐन पन्नाशीतही काजोल तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘करण अर्जुन’, ‘इश्क’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुन काजोलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला चार वर्ष डेट केल्यानंतर काजोलने १९९९ साली त्याच्याशी विवाह करत संसार थाटला. त्यांना निसा आणि युग ही दोन मुलं आहेत. परंतु, लेक निसाला जन्म देण्याअगोदर काजोलचा दोन वेळा गर्भपात झाला होता.

काजोलने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते. या मुलाखतीत तिने लग्न, मुलं, करिअर यावरही भाष्य केलं होत. “२५ वर्षांपूर्वी हलचल चित्रपटाच्या सेटवर मी आणि अजय पहिल्यांदा एकमेकांना भेटलो. चार वर्ष डेट केल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबीयांची परवानगी होती. परंतु, माझे वडील चार दिवस माझ्याबरोबर बोलले नव्हते. माझ्या करिअर मी लक्ष केंद्रीत करावं असं त्यांना वाटत होतं. पण, मी माझ्या निर्णयावर ठाम होते. आम्हाला पुढचं आयुष्य एकत्र जगायचं होतं. आम्ही घरीच लग्न केलं आणि मीडियाला चुकीच्या ठिकाणाची माहिती दिली होती. आम्ही मराठी आणि पंजाबी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं,” असा खुलासा काजोलने केला होता.

"तुमचा बिअर बार आहे का?", समीर वानखेडेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, "डान्स बार..."

काजोलने तिच्या गर्भपातावरही या मुलाखतीत भाष्य केलं होतं. काजोल म्हणाली, “आम्ही लग्नानंतर आईबाबा होण्याचा निर्णय घेतला होता. २००१ साली कभी खुशी कभी गम चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी गरोदर होते. पण, माझा गर्भपात झाला. मी तेव्हा रुग्णालयात होते. त्या चित्रपटाने चांगली कमाई केली. पण, मी खूश नव्हते. त्यानंतरही माझा पुन्हा गर्भपात झाला होता. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. पण त्यानंतर निसा आणि युगचा जन्म झाला. आता आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे.”

“हा ५७ वर्षांचा अभिनेता आहे?”, ‘जवान’चं गाणं पाहून भारावले आनंद महिंद्रा, शाहरुख उत्तर देत म्हणाला...

काजोल आणि अजय देवगणने एकत्र अनेक चित्रपटांत काम केलं आहे. त्यांची ऑन स्क्रीन जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. ‘ट्रायल’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजमध्ये काजल दिसली होती. या सीरिजमध्ये तिने दिलेल्या किसींग सीनची चर्चा रंगली होती.

 

 

Web Title: kajol devgn birthday special actress had two miscarriage after marriage with ajay devgn once happened in kabhi kushi kabhi gum shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.