तोल जाऊन पडणार होती काजोल, लेकाने पुढे येत आईला असा दिला आधार; तुम्हीही कराल त्याचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 17:49 IST2023-10-21T17:42:51+5:302023-10-21T17:49:45+5:30
अभिनेत्री काजोल कुटुंबीयांसह दुर्गापुजेला उपस्थित होती. या दरम्यानचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तोल जाऊन पडणार होती काजोल, लेकाने पुढे येत आईला असा दिला आधार; तुम्हीही कराल त्याचं कौतुक
सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटीही दुर्गापूजामध्ये सहभागी होताना दिसतात. यंदाही बॉलिवूड अभिनेत्रींनी दुर्गापुजेला हजेरी लावली होती. अभिनेत्री काजोल कुटुंबीयांसह दुर्गापुजेला उपस्थित होती. या दरम्यानचा तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काजोल बहीण तनिषा मुखर्जी आणि लेक युगबरोबर दुर्गापुजेसाठी आली होती.
दुर्गापुजेसाठी काजोलने गुलाबी रंगाची साडी नेसून खास लूक केला होता. या कार्यक्रमादरम्यान काजोल पडता पडता वाचली. काजोलचा या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन काजोलचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काजोल फोनमध्ये बघत चालत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर स्टेजवरुन उतरताना तिचा तोल जातो. काजोलचा तोल गेल्यानंतर बाजुलाच उभी असलेली तनिषा तिला सावरते. यात काजोलचा मोबाईलही खाली पडल्याचं दिसत आहे.
काजोलला पडताना पाहून लगेचच तनिषाबरोबर तिचा लेक युगही आईला सावरण्यासाठी पुढे आल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. दुर्गापुजेदरम्यानचा काजोलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर कमेंट करत नेटकरी काजोलचा लेक युगचं कौतुक करत आहेत.