'ईला'मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय काजोल, अजय देवगणने शेअर केले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 11:46 AM2018-07-06T11:46:56+5:302018-07-06T11:49:53+5:30
अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार झाली आहे. काजोल शाहरुख खानसोबत रोहित शेट्टीच्या दिलवाले सिनेमात दिसली होती.
अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार झाली आहे. काजोल शाहरुख खानसोबत रोहित शेट्टीच्या दिलवाले सिनेमात दिसली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी ती व्हीआयपी2’मध्ये धनुष सोबत दिसली होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप झाला होता. या चित्रपटात धनुष केवळ अभिनयच नाही, तर या चित्रपटाला प्रोड्यूसही केला होता एवढेच नव्हे तर धनुषने या चित्रपटाचे डायलॉग आणि कथाही लिहिली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून काजोल दुसऱ्यांदा साउथ चित्रपटात काम केले होते. मात्र आता ती अजय देवगणच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बॉलिवूडमध्ये एंट्री मारतेय.
She's here, there, everywhere!!! #HelicopterEela is coming on 14th September.@KajolAtUN@riddhisen896@pradeepsrkar@HelicopterEela@ADFfilms@PenMovies@jayantilalgadapic.twitter.com/DAkQklVzRw
— Ajay Devgn (@ajaydevgn) July 5, 2018
काजोल प्रदीप सरकार दिग्दर्शित करत असलेल्या 'ईला' सिनेमातून कमबॅक करतेय. हा सिनेनाचा पहिले पोस्टर काजोलचा पती अजय देवगणने सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना त्याने रिलीज डेटचा देखील खुसाला केला आहे. चित्रपटाची कथा आई आणि मुलांमधील संबंधांवर आधारित असून, काळजाचा ठाव घेणारी असणार आहे. 'ईला' हा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधरित आहे. दिग्दर्शक प्रदीप सरकार या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले होते की, या सिनेमाची स्क्रिप्ट माझ्याकडे जवळपास दोन महिन्याआधी आली होती. हा सिनेमा गुजराती नाटकावर आधारित असल्यामुळे मला त्यांचे इमोशन्स पकडायला वेळ लागले. या चित्रपटात काजोल पुन्हा एकदा सिंगल मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी प्रदीप सरकारने ‘परिणिता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर काजोल सिंगल मदर बनणार असल्याने तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे. काजोलने यापूर्वी २०१० साली ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटामध्ये सिंगल मदरची भूमिका साकारली होती.