All is Well! करण जोहरबद्दल पहिल्यांदा बोलली काजोल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 21:54 IST2018-08-28T21:54:29+5:302018-08-28T21:54:54+5:30
बॉलिवूडमध्ये कधी मैत्री होईल आणि कधी मित्रांचे शत्रू होतील, याचा नेम नाही. मध्यंतरी अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक व निर्माता करण जोहरबद्दलही असेच काही घडले.

All is Well! करण जोहरबद्दल पहिल्यांदा बोलली काजोल!!
बॉलिवूडमध्ये कधी मैत्री होईल आणि कधी मित्रांचे शत्रू होतील, याचा नेम नाही. मध्यंतरी अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक व निर्माता करण जोहरबद्दलही असेच काही घडले. खरे तर करण व काजोल कित्येक वर्षांपासूनचे मित्र. पण दोन वर्षांपूर्वी दोघांचेही वाजले. २०१६ मध्ये काजोलचा पती अजय देवगणचा ‘शिवाय’ आणि करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ यांचा बॉक्सआॅफिसवर सामना रंगणार होता. याचदरम्यान करणने ‘शिवाय’ची नकारात्मक प्रसिद्धी करण्यासाठी २५ लाख दिलेत,अशी बातमी पसरली होती. यानंतर करण व काजोल यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.
आपल्या बायोग्राफीत करणने काजोलसोबतच्या वादाचा उल्लेख केला होता. आमच्यात काही मतभेद झालेत. असे काही घडले, ज्यामुळे मी खोलवर दुखावला गेलो. मी याबद्दल काहीही बोलणार नाही. खरे तर तिच्यात व माझ्यात काहीही बिनसलेले नव्हतेच. जे काही झाले ते माझ्यात व तिच्या पतीदरम्यान झाले होते. जे काही घडले, ते केवळ ती, मी व तिचा पती एवढे तिघेच जाणतो. पण मी ते सगळे मागे सोडू इच्छितो. २५ वर्षांची मैत्री विसरून ती आपल्या पतीची साथ देत असेल तर माझ्यामते, हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. मी समजू शकतो. मी तिच्या अतिच जवळ होतो. पण आता आमच्यातील सगळे काही संपलेले आहे. तिने मला चांगलेच दुखावले, असे करणने यात लिहिले होते.
आता हे सगळे ‘रामायण’ सांगण्यामागचे कारण म्हणजे, गत दोन वर्षांत करण व काजोल यांच्यातील मतभेद पूर्णपणे मिटले आहेत. होय, अलीकडे स्पॉटब्वॉयला दिलेल्या मुलाखतीत काजोल करणबद्दल बोलली. ‘बिल्कुल, आमच्यात सगळे काही एकमद ठीक आहे,’ असे ती म्हणाली.
करण व काजोलची मैत्री ‘कुछ कुछ होता है’पासून सुरु झाली आणि पुढे बहरत गेली.