काजोलचा खुलासा; ‘मुलगी न्यासाला शिक्षणासाठी सिंगापूरला पाठविण्याचा निर्णय अवघड’!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 11:53 AM2018-03-15T11:53:15+5:302018-03-15T17:23:15+5:30

अभिनेत्री काजोल आणि तिचा पती अभिनेता अजय देवगण या दाम्पत्याने मुलगी न्यासाला तिच्या शिक्षणासाठी सिंगापूरला पाठविले आहे. न्यासाचे अ‍ॅडमिशन ...

Kajol reveals; 'Girl Justice decided to send Singapore for education difficult'! | काजोलचा खुलासा; ‘मुलगी न्यासाला शिक्षणासाठी सिंगापूरला पाठविण्याचा निर्णय अवघड’!

काजोलचा खुलासा; ‘मुलगी न्यासाला शिक्षणासाठी सिंगापूरला पाठविण्याचा निर्णय अवघड’!

googlenewsNext
िनेत्री काजोल आणि तिचा पती अभिनेता अजय देवगण या दाम्पत्याने मुलगी न्यासाला तिच्या शिक्षणासाठी सिंगापूरला पाठविले आहे. न्यासाचे अ‍ॅडमिशन सिंगापूरच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मुलीला भेटण्यासाठी अजय आणि काजोल सिंगापूरला गेले होते. एका मुलाखतीत काजोलने सांगितले की, न्यासाला विदेशात पाठविण्याचा निर्णय ऐकून अजय देवगण हैराण झाला होता. 

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने म्हटले की, स्वत:पासून आपल्या मुलांना दूर करणे प्रत्येक आई-वडिलांसाठी अवघड असते. हा निर्णय माझ्यासाठी खूपच अवघड होता, मात्र माझ्यापेक्षा अजयसाठी तो क्षण आणि निर्णय अवघड होता. मी बोर्डिंग स्कूलमधूनच शिक्षण घेतले आहे. माझी आई (अभिनेत्री तनुजा) आणि बहीण (तनिषा मुखर्जी) यांनीदेखील बोर्डिंग स्कूलमधूनच आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे मुलांच्या भवितव्यासाठी पालक म्हणून अशाप्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. आपल्यासाठी ही बाब जरी कष्टदायी असली तरी, मुलांच्या आयुष्यासाठी फायदेशीर आणि गरजेची असते, असे मला वाटते. 

काही काळापूर्वीच मीडियाशी बोलताना अजय देवगणने हे मान्य केले होते की, आम्हा दोघांमध्ये काजोल खूप कठोर आहे. काजोल न्यासा आणि यूग या दोन मुलांची आई आहे. जेव्हा काजोलला, फोटोग्राफर जेव्हा मुलांचे फोटो काढतात तेव्हा त्याचा स्टार किड्सवर काय परिणाम होतो असे विचारण्यात आले होते, तेव्हा काजोलने म्हटले होते की, मला असे वाटते लोकांच्या अटेन्शन अगोदरच मुले समजूतदार होतात. परंतु एक स्टारकिड्स म्हणून त्यांना आपली सुरक्षा आणि प्रायव्हसी असायला हवी. 

अजय देवगण आणि काजोल या दाम्पत्याच्या लग्नाला जवळपास १९ वर्ष पूर्ण झाली आहेत. अजय आणि काजोल ८ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘टूनपुर का हीरो’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. या अगोदर अजय आणि काजोलने ‘हलचल’, ‘प्यार तो होना ही था’, ‘राजू चाचा’ आणि ‘यू मी और हम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Web Title: Kajol reveals; 'Girl Justice decided to send Singapore for education difficult'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.